---Advertisement---
जळगाव शहर

जळगाव रेल्वे स्टेशन जवळ ‘द बर्निंग कंटनेर’, इलेक्ट्रॉनिक वस्तू खाक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । जळगाव शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या मालधक्क्यालगत इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन उभ्या असलेल्या कंटनेरला शनिवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. घटनास्थळी जळगाव मनपाचे तीन अग्निशमन बंब दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

burning truck jpg webp

जळगाव रेल्वे स्थानकाजवळ मोठा मालधक्का असून दररोज त्याठिकाणाहून मालाची आवक जावक होत असते. जळगाव येथील एस.के.ट्रान्सलाईनच्या वाहनातून दररोज इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर साहित्याची वाहतूक केली जाते. शुक्रवारी पुणे येथून फ्रिजसह काही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन काही कंटनेर जळगावकडे निघाले होते. चालक जामीद खान हे कंटनेर क्रमांक एमएच.१९.सीवाय.२५११ ने सकाळी ९ वाजेपूर्वी जळगावात पोहचले. कंटनेरमधील साहित्य रेल्वेने कोलकाता येथे पाठवायचे असल्याने मालधक्क्याजवळ कंटनेर लावून चालक त्यात झोपले होते.

---Advertisement---

दुपारी ५ वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन कंटनेरला आग लागली. काही क्षणात आग पसरल्याने कंटनेरमधील फ्रिज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग आणि धुराचे लोळ उठू लागल्याने परिसरात गर्दी जमली. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जळगाव शहर मनपाच्या तीन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून वाहनातून फ्रिज बाहेर काढण्यात येत आहे.

आगीत अनेक फ्रिज जळून खाक झाले असून इतर काही फ्रिजचे नुकसान झाले आहे. अंदाजे ३० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---