⁠ 
शनिवार, मे 18, 2024

रावेरात घरफोडी; सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जुलै २०२१ । रावेर शहरातील देवकी नगर भागात एका घरात अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरी करणारे अज्ञात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, राजकुमार देवदास गनवाणी (वय 50, रा. देवकी नगर रावेर) हे शेती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ३० जून रोजी रात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान ते घराला कुलूप लावून कामाच्यानिमित्त बाहेर गेले होते. त्याचवेळी अज्ञात तीन चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे शिक्के, ९ हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के, २ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या लहान मुलांचा खुळखुळा आणि ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. 

चोरटे चोरी करताना सीसीटीव्ही कैद झाले आहे. यात तीन जण चोरी करताना आढळून आले आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात गुरुन 113/2021 भादवी कलम 457,380 प्रमाणे अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुडील तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल कुमार नाईक करीत आहे