⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | भडगाव | भडगावात भर दिवसा घरफोडी ; साडेतीन तोळे सोन व रोख दिड लाखाचा ऐवज लंपास

भडगावात भर दिवसा घरफोडी ; साडेतीन तोळे सोन व रोख दिड लाखाचा ऐवज लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । भडगाव शहरातील विवेकानंद नगर भागात अज्ञात चोरट्यांनी साडेतीन तोळे सोन्याच्या बांगडया व दिड लाख रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना काल शुक्रवारी घडली. दरम्यान, या बाबत भडगाव पोलिस स्टशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की भडगांव शहरातील विवेकानंद नगर भागातील रहिवाशी ईश्वर लोटन पाटील (जि.प.शिक्षक) भडगांव हे कुटुंबासह लग्ना निमित्त सकाळी बाहेरगावी गेले होते याचाच फायदा अज्ञात चोरट्यांनी घेत भरदिवसा साडेतीन वाजेच्या सुमारास घराचा समोरील दरवाजा तोडुन घरामध्ये प्रवेश करीत घरातील बेडरूम मधील सामान अस्ता व्यस्त फेकुन शोकेस मधील साडेतीन तोळ्याच्या सोन्याच्या बांगडया व वरच्या बेडरुम मधील कपाटातील तिजोरीतुन दिड लाख रुपये रोख रक्कम चोरुन चोरट्यांनी पोबारा केल्याची माहिती ईश्वर लोटन पाटील (जि.प.शिक्षक) हे घरी आल्यावर उघडकीस आले आहे.

याबाबत पुढील तपास भडगांव पोलिस करीत आहे.घटनास्थळी भडगांव पोलिस निरिक्षक अशोक उतेकर,पो.उप निरी- आनंद पठारे, सुशिल सोनवणे पो.हे.कॉ. प्रल्हाद शिंदे, पो.ना.लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, स्वप्नील पाटील यांनी भेट देत घटनास्थळाची पहाणी करत सदर घटनेच्या तपासा कामी श्वान पथकास पाचारन करण्यात येणार असल्याची माहिती भडगांव पोलिसांनी दिली

भडगांव शहरातील बाळदरोड विवेकानंद नगर भाग हा सुशिक्षित व उच्चभ्रू लोकांनची कॉलणी म्हणुन ओळखले जाते त्याच कॉलणीत भरदिवसा एवढी मोठी चोरीची घटना घडली छोटया मोठ्या भुरटया चोऱ्या तर नेहमी होतच असतात पण त्या आरोपीनंचा शोध लागतच नाही पण या बाळद रोड भागात झालेल्या मोठ्या चोरीबाबत आता तरी आरोपीनचा शोध भडगांव पोलिस निरिक्षक अशोक उतेकर लावतील का? व भडगांव शहरासह तालुक्यातील चोरट्यांना आळा बसेल का? असे भडगांव शहरासह तालुक्यातील सुज्ञ नागरीकांन कडुन बोलले जात आहे त्यामुळे या चोरीचा तपास लावण्याचे भडगांव पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्या समोर मोठे आव्हान ठरणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.