जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । वाघ नगर परिसरातील गुरूकृपा कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण ७३ हजाराचां मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे.
निलेश अशोक किरंगे (वय-३१) रा. गुरूकृपा कॉलनी, वाघ नगर जळगाव हे वास्तव्याला आहे. बुधवार ८ जून रोजी रात्री १० वाजेपासून ते १० जून रेाजी रात्री ८ वाजेदरम्याने त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी बंद घर असल्याचा संधीचा फायदा घेत घराचा मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील लोखंडी कपाटातून दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची चैन आणि चांदीच्या साखळ्या असा एकुण ७३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत निलेश किरंगे यांनी तात्काळ रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनिवार ११ जून रोजी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतिष हारनोळ करीत आहे.