जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ काही कमी होताना दिसत असून अशातच रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील टी.एम. नगर भागात नवीन बांधकाम सुरू असलेल्या घराचे कडीकोयंडा तोडून नळ व लाइट फिटिंगचे साहित्य चोरणाऱ्या १९ वर्षीय तरुणासह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

टी.एम. नगर येथील एका घरात २८ ते २९ डिसेंबर २०२६ दरम्यान घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतील नळ फिटिंग आणि लाइट फिटिंगचे महागडे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी ७ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलिस मास्टर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. पथकाने घटनास्थळासह विविध ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॉलनीतील सय्यद उबेद सय्यद रफिक पटवे (क्य १९) याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले.

त्याची अधिक चौकशी केली असता या गुन्ह्यात त्याच्यासोबत एक विधिसंघर्षित बालक सामील असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी सय्यद उबेद याच्याकडून चोरीला गेलेले २८००० रुपये किमतीचे नळ फिटिंग आणि लाइट फिटिंगचे साहित्य जप्त केले आहे.



