जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रील २०२२ । एरंडोल येथे मातोश्री नगर व आदर्श नगरात अज्ञात चोरट्यांनी भल्यापहाटे तीन ठिकाणी घरफोडी करून १लाखांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ३०मार्च रोजी घडली असून या घटनेने नविन वसाहतीमधील नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनेची येथील पोलिसांत तक्रार दाखल आहे.
मातोश्री नगरातील रहीवासी शंकर गोसावी यांच्या घरातुन अज्ञात चोरट्यांनी ४०हजार रूपये रोख, १तोळे सोने व १०हजार रूपये किंमतीचे चांदीचे दागीने असे ऐवज लांबविला. तर याच भागातील संदीप पाटील यांच्या घरातील देव्हार्यातुन देवाच्या चांदीच्या मुर्त्या लंपास करण्यात आल्या. आदर्श नगरात माध्यमिक शिक्षक आर.एम.कुलकर्णी यांच्याकडील घरफोडीत ८हजार रूपये रोख, ७ग्रँम सोने चोरून अज्ञात चोरटे पसार झाले. याबाबत शंकर गोसावी यांनी एरंडोल पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान रात्री पोलिसांनी गस्त घालावी अशी अपेक्षा कॉलनी परिसरातील लोकांनी केली आहे.