जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । पाचोरा तालुक्यातील आखातवाडे येथील शेतकरी सुनील आधार गढरी (वय २०) यांच्या मालकीची बैल जोडी अज्ञात भामट्यांनी चोरून नेली . ही घटना २५ रोजी घडली याबाबत पाचोरा पोलिसांत अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी सुनील आधार गढरी (वय २०, रा.आखातवाडे ता. पाचोरा) येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यस आहे. त्यांच्या मालकीची बैल जोडी २२ ते २६ जुलै दरम्यान कुणीतरी अज्ञात भामट्यांनी चोरून नेली. हा प्रकार २७ रोजी उघडीस आला. त्यांनतर शेतकरी सुनील आधार गढरी यांनी पाचोरा पोलिसांत घाव घेत तक्रार दिली. घटनास्थळी पोनी किसन लक्ष्मण नजन यांनी भेट दिली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्ध भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नरेद्र शिंदे करत आहेत.