जळगाव जिल्हा
पोळ्याच्या दिवशीच बैलराजाचा गेला बळी
जळगाव लाईव्ह न्यूज | ६ सप्टेंबर २०२१ | चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण येथे लक्ष्मण उर्फ संजय सानप यांच्या बैलराजाला विजेचा शॉक लागला आणि त्या बैलराजाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.
आज बैलपोळा या सणाच्या दिवशी अशी वाईट व दुःखदायक घटना घडल्याने संपूर्ण गावपरिसर तसेच चाळीसगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी महावितरणचे अधिकारी बाविस्कर व काटकर यांनी पंचनामा केला.