---Advertisement---
महाराष्ट्र हवामान

यंदाचा पावसाळा कसा राहील? भेंडवळची भविष्यवाणी जाहीर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२३ । दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलढाण्यातील भेंडवळ येथील घटमांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली होती. त्यानुसार ‘भेंडवळची घटमांडणी’चे भाकीत आज रविवारी सकाळी जाहीर करण्यात आले आहे. राज्यात यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टी पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. सोबतच राजकीय उलथापालथ होत राहील असा अदाजही वर्तवण्यात आला आहे.

bhendwal bhavishyavani 2022 jpg webp

‘भेंडवळची घटमांडणी’ भविष्यवाणीकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागून होते. यंदा अल निनोमुळे पावसाळा कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा विषय बनला होता. मात्र ‘भेंडवळची घटमांडणी’ च्या भविष्यवाणीमध्ये चांगला पाऊस होणार असल्याचे म्हटलं आहे.

---Advertisement---

भेंडवळमध्ये 350 वर्षांपासूनची परंपरा
पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्याची परंपरा आहे. गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जात आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येते. यंदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘भेंडवळची घटमांडणी’ पार पडली. तर राज्यात यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टी पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. तर हे अंदाज ऐकण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. नेमके काय काय अंदाज यावर्षभराचे असतील पाहूया….

पावसाबाबत अंदाज
जून महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे पेरणी उशिरा होईल
जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे.
ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार असून, अतिवृष्टी देखील होईल
सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल
पण अवकाळी पाऊस भरपूर होणार असून, पिकांचे नुकसान होईल

पीक पाण्यासंबंधीचे अंदाज
यावर्षी पिकांवर रोगराई राहिल
कापूस पीक मध्यम होईल, कापसात तेजी असेल
ज्वारी सर्वसाधारण राहिल
तूर पीक चांगले असेल
मूग पीक सर्वसाधारण असेल
उडीद मोघम सर्वसाधारण
तीळ सर्वसाधारण मात्र नासाडी होईल
बाजरी सर्व साधारण मात्र नासाडी होईल
तांदुळाचं चांगलं पीक येईल
गहू सर्वसाधारण बाजार भाव तेजीत राहिल
हरभरा अनिश्चित कमी जास्त पीक येईल. मात्र नुकसान सुद्धा होईल

देशासंबंधीचे अंदाज
संरक्षण मजबूत राहिल, मात्र शेजारील राष्ट्राच्या कुरघोड्या असतील
देशाची आर्थिक परिस्थिती खालावेल, चढउतार होईल

राजकीय अंदाज
राजा कायम आहे, पण राजाला अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच राजा कायम तणावात असेल.
राजकीय उलथापालथ होत राहिल
नैसर्गिक आपत्ती येत राहतील, भूकंप प्रमाण जास्त असेल

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---