⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | महाराष्ट्र | शेतकऱ्यांनो.. भेंडवळची भविष्यवाणी झाली जाहीर ! यंदा पीक पाणी, पावसाचा अंदाज काय?

शेतकऱ्यांनो.. भेंडवळची भविष्यवाणी झाली जाहीर ! यंदा पीक पाणी, पावसाचा अंदाज काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज : ११ मे २०२४ : यंदाच्या मान्सूनची प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना असून बुलढाण्यात दरवर्षी पावसाळा सुरु होण्याआधी भेंडवळची घट मांडणी केली जाते. शेतकरी या भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहतात. कारण त्यावरुन पीक पाण्याचा अंदाज बांधता येतो.

दरम्यान, आज शनिवारी पहाटे ६ वाजता भेंडवळची घटमांडणी करण्यात आली. यंदाच्या वर्षासाठी भेंडवळच्या घट मांडणीतून पीक पाणी, पावसाच भाकीत समोर आलय.यंदा देशाचा राजा कायम राहील. चांगला पाऊस होईल, खरीप पिके साधारण राहतील. रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे. याच घटमांडणीला भेंडवळचं भाकीत असंही म्हणतात. आज शनिवारी पहाटे ६ वाजता भेंडवळची घटमांडणी करण्यात आली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घट मांडणी करण्यात आली.

घट मांडणीच्या अंदाजानुसार, यंदा देशाचा राजा कायम राहील. चांगला पाऊस होईल, खरीप पिके साधारण राहतील. रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पहिल्या महिन्यात कमी पाऊस असेल. दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण म्हणजे पहिल्या महिन्यापेक्षा जास्त पाऊस असेल. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस पडेल असा भेंडवळच भाकीत आहे. अवकाळी पाऊस सुद्धा यंदा भरपूर असेल असा भेंडवळचा अंदाज आहे.

भेंडवळ घट मांडणीतून कसं वर्तवतात भाकीत?
भेंडवळ घट मांडणीची परंपरा मागच्या 300 वर्षांपासून सुरु आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घट मांडणी केली जाते. त्यात 18 प्रकारचे धान्य आणि गोल खड्डा करून त्यात मटकी ठेवली जाते. रात्री ज्या हालचाली होतील, त्याचे निरीक्षण करून दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवलं जातं.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.