---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

बाबो..! जळगावच्या बांधकाम व्यावसायिक लावला 70 लाखाचा चुना, अशी झाली फसवणूक?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२४ । शेतजमीन खरेदी विक्री व्यवहारापोटी रक्कम घेऊनही खरेदी करून न देता बांधकाम व्यावसायिक पीयूष कमलकिशोर मणियार (२६, रा. गणेशवाडी) यांची ७० लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २८ डिसेंबर २०२३ ते १४ जूनदरम्यान घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शेतकरी व एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन एजंटला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

state bank fraud of rs 1 5 crore crime against 17 persons including bank valuers jpg webp

बांधकाम व्यावसायिक पीयूष मणियार यांना शेतजमीन घ्यायची आहे. त्यासाठी रिअल इस्टेट एजंट धीरज विजय पाटील (रा. रिंगरोड, जळगाव) याने रवींद्र शांताराम पाटील (रा. शिरसोली, ता. जळगाव) या शेतकऱ्याची शिरसोली प्र.बो. येथील गट क्र. २२३/३मधील शेतजमीन विक्री असल्याचे सांगितले.

---Advertisement---

त्यात मणियार व शेतकरी पाटील यांच्यात त्या जमिनीचा व्यवहार ९० लाख रुपयांमध्ये ठरला. त्यानुसार मणियार यांनी आरटीजीएस व रोखीने एकूण ७० लाख ४८ हजार रुपये दिले. यात हा व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी धीरज पाटील याची असताना त्याने रजिस्ट्रेशनसाठी शेतकऱ्याला आणले नाही. तसेच रक्कमदेखील परत दिली नाही. दरम्यान याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी धीरज पाटील यास अटक केली आहे. संशयीत आरोपी धीरज पाटील यास शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दि.१७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---