जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । अमळनेर येथील भाजपाचे माजी नेते उदय वाघ यांच्या स्मृती दिनानिमित्त सर्व पक्षीय नेते व सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी स्मारकावर येऊन अभिवादन केले. यावेळी उदय वाघ यांच्या जीवनपटाचे प्रदर्शन करण्यात आले. राजकीय व सामाजिक नेत्यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच दिवसभरात हजारो कार्यकर्ते व मित्रपरिवाराने वाघ याना अभिवादन केले.
उदय वाघ यांच्या स्मृती दिनानिमित्त धुळे रोडवरील स्मारकावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. “उदय वाघ यांचे चरित्र लिहिले तर एकनाथराव खडसे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.” असे खडसे यांनी सांगताच भाजप कार्यकर्ते भावनाविवश झाले.
यांनी केले अभिवादन
खासदार उन्मेष पाटील, राष्ट्रवादीचे आ.अनिल पाटील, माजी आ.साहेबराव पाटील, आ.सुरेश भोळे, भाजपच्या माजी आ.स्मिता वाघ, नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, बाजार समितीचे मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, भैरवी पलांडे, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, धरणगावचे ज्ञानेश्वर महाजन खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक डॉ संदेश गुजराथी, प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडा, अर्बन बँकेचे संचालक पंकज मुंदडा, वसुंधरा लांडगे, अभिषेक पाटील, प्रवीण जैन, बाजार समितीचे माजी सभापती प्रफुल पाटील, माजी संचालक विजय पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, भाजपचे किशोर काळकर, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष श्याम पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रकाश ताळे, डॉ. आशिष पाटील, राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, विनोद जाधव, निवृत्ती बागुल, शिवसेनेचे महेश देशमुख, जिप सदस्य मीनाताई पाटील, संगीता भिल, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, शीतल देशमुख, सरचिटणीस राकेश पाटील, जिजाब पाटील, राहुल पाटील, बबलू राजपूत, शिक्षण संस्था संघटना अध्यक्ष जयवंतराव पाटील, ग्रामसेवक संघटना यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
प्रदर्शन मांडले
स्मारक स्थळी भैरवी पलांडे यांच्या संकल्पनेतून, राकेश पाटील, उमेश वाल्हे, शीतल देशमुख, चंद्रकांत कंखरे यांनी उदय वाघ यांच्या विद्यार्थी दशेपासून, विद्यार्थी परिषद ते राज्याच्या राजकारणापर्यंत महत्वाच्या घडामोडीचे टिपलेले प्रसंग, आंदोलने, मोर्चे, बैठकी, संघर्ष, लढा, पक्ष संघटन यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले होते. राजकारण आणि समाजकारण या पलीकडे असलेल्या मैत्रीच्या स्मृतींना विविध क्षेत्रातील व्यक्तींनी उजाळा दिला. दिवसभरात हजारो कार्यकर्ते व मित्रपरिवाराने वाघ याना अभिवादन केले.