दहा हजारांची लाच : लाचखोर मंडळाधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२३ । सातबारा उतार्यावर चुकीने विहिरीची नोंद झाल्यानंतर ती कमी करण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती दहा हजारांची लाच स्वीकारताना शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील मंडळाधिकारी अशोक चिंधू गुजर यास धुळे एसीबीने अटक केली आहे,
धुळे जिल्ह्यातील वकवाड, ता.शिरपूर येथील तक्रारदाराची वडिलोपार्जित शेतजमीन असून त्या जमिनीवर चुकून विहिर नसतानाही तशी नोंद झाल्याने त्यांना शासकीय अनुदान मंजुरीसाठी अर्ज करता येत नव्हते. वाघाडी मंडळाधिकारी अशोक गुजर यांची भेट घेतल्यानंतर शेतजमिनी संदर्भात यापूर्वी केलेल्या हक्कसोड कामाचे बक्षीस म्हणून तसेच सातबारा उतार्यावरील विहिरीची नोंद कमी करण्याच्या मोबदल्यात 15 हजारांची लाच मागितल्यानंतर दहा हजारात तडजोड झाली व या संदर्भात सोमवार, 8 मे रोजी तक्रारदाराने दूरध्वनीवरून तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला.
मंगळवारी दुपारी मंडळाधिकारी गुजर यांनी शिरपूर येथील मिलिंद नगरातील राहत्या घरी तक्रारदाराला लाच रक्कम देण्यासाठी बोलावल्यानंतर लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली.