Breaking : जादूटोणा उतरवण्यासाठी आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । जादूटोणा उतरवण्यासाठी आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले आहेत. अशी प्रतिक्रिया खुद्द बच्चू कडू यांनी दिली आहे. शिवसेनेचे काद्दावर नेते एकनाथ शिंदे हे ५० आमदार घेऊन गुवाहाटी येथे ठाण मांडून बसले आहेत. या आमदारांवर काळी जादू करण्यात आली आहे असे आरोप संजय राऊत यांनीं केले होते. यावर उत्तर देताना प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू म्हणाले कि, आमच्यावर झालेला जादूटोणा उतरवण्यासाठी आम्ही आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहोत.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदेवासी झालेले ५० आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहोचले आहेत. त्यांना चोख सुरक्षेत दर्शनाला नेण्यात आले आहे. पावला पावलावर बॉडीगार्ड वा बाउंसर, प्रत्येक कोपऱ्यावर पोलीस बंदोबस्त, रस्ते पूर्णपणे सर्वसामान्यांसाठी बंद, पोलिसांचा कडक बंदोबस्तात अश्या टाईट वातावरणात शिंदे व शिंदेवासी झालेल्या इतर आमदारांना देवीच्या दर्शनासाठी नेण्यात आले आहे.
शिवसेना बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहचले असून आज सायंकाळी त्यांना पुन्हा मुंबईला आणण्यात येणार आहे. अश्यावेळी त्यांना आजच गोव्याला आणण्यात येणार आहे. आणि उद्या त्यांना मुंबईत आणण्यात येणार आहेत. दुपारी 3.30 च्या सुमारास आमदार गोव्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत