⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | महाराष्ट्र | एकनाथ शिंदे गटाच्या दोन्ही हातात लाडू! भाजप-शिवसेना या दोघांनीही दिल्या या ऑफर

एकनाथ शिंदे गटाच्या दोन्ही हातात लाडू! भाजप-शिवसेना या दोघांनीही दिल्या या ऑफर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांना यावेळी सर्वत्र चांगल्या ऑफर्स येत आहेत. आसाममधील गुवाहाटी येथे असलेले सर्व आमदारांना मुंबईत परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत भाजप असो की शिवसेना दोन्ही बाजूंनी बंडखोरांना चांगले प्रस्ताव दिले जात आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, सर्व बंडखोर आमदारांनी २४ तासात मुंबईत परत यावे आणि मुख्यमंत्री उद्धव यांच्याशी या विषयावर चर्चा करावी. सर्व आमदारांची इच्छा असल्यास आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करण्यास तयार आहोत, मात्र त्यासाठी त्यांना येथे येऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी लागेल.

भाजपची आकर्षक ऑफर
याशिवाय भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांना ऑफर दिली आहे. सरकार स्थापनेचा प्रस्ताव मांडताना भाजपने शिंदे गटाला सरकारमध्ये चांगली मंत्रिपदे देण्याची ऑफरही दिल्याचे मानले जात आहे.

केंद्रातही 2 मंत्रीपदाची ऑफर
विशेष म्हणजे शिंदे यांना एनडीएच्या छावणीत आणण्यासाठी भाजपकडून 13 मंत्रीपदे आणि केंद्रीय मंत्रिपदाची ऑफरही देण्यात आली आहे.

राऊत यांच्या ऑफरमुळे पॉवर असंतुलन
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊतही आपल्या पक्षाचे सरकार वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपल्या बंडखोर आमदारांनाही अशी ऑफर दिली आहे की, सर्वांची इच्छा असेल तर महाविकास आघाडीसोबतची युती तोडता येईल. अशा स्थितीत राऊत यांच्या वक्तव्याने मित्रपक्ष काँग्रेस दुखावली असून त्यांनी तातडीने बैठक बोलावण्याचे आदेश दिले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.