⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | Book Publish : पंढरपुर वारीचा वृत्तांत भाविकांसाठी प्रेरणादायी : ह.भ.प.प्रसाद महाराज

Book Publish : पंढरपुर वारीचा वृत्तांत भाविकांसाठी प्रेरणादायी : ह.भ.प.प्रसाद महाराज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । संत सखाराम महाराजांच्या अमळनेर ते पंढरपुर पायीवारीचे बभळाज येथील महेश जोशी व संभाजीनगर येथील प्रविण कुळकर्णी यांनी केलेले दैनिक वृत्तांत भाविकांच्या हृदयाला भिडणारे आहे. या वृत्तांताचे पुस्तक रुपाने केलेले संकलन आपणास पुढील वर्षी पंढरपुर वारी करण्यासाठी प्रेरणा देईल, असे प्रतिपादन श्री संत सखाराम विठ्ठल रुक्मिणी संस्थान अमळनेर-पंढरपुरचे विद्यमान गादिपती हभप श्री प्रसाद महाराज यांनी केले.

‘वारी पंढरीची दिंडी सखारामाची’ व ‘पंढरपुरा नेईन गुढी!’ या दोन संकलित पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले कि, वारी म्हणजे काय हे प्रत्येकाने समजुन घेतले पाहिजे. या दोन्ही पुस्तकातील मनोगत लेखकांच्या भावना सांगतात. वारीत दररोज लिहिलेले वृत्त परिवारातील सदस्यांना भावले. जळगाव येथील गिरीश कुळकर्णी यांनी २४ दिवसांचे वृत्त संकलित करुन पुस्तक तयार केले. त्यामुळे वाचकांना ते एकाच ठिकाणी वाचावयास मिळणार आहे. वारकरी संप्रदायावर श्रद्धा असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह