⁠ 
शनिवार, मे 4, 2024

पात्रता फक्त 4थी पास अन् पगार 47000 पर्यंत ; मुंबई उच्च न्यायालयात निघाली भरती

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । इयत्ता 4थी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी चालून आलीय. मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती निघाली आहे. स्वयंपाकी या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. यासाठी मुलाखत देखील घेतली जाईल मुलाखत दिनांक 27 मार्च 2023 आहे. Bombay High Court Recruitment 2023

रिक्त पदाचे नाव : स्वयंपाकी / Cook

आवश्यक पात्रता : उमेदवार कमीत-कमी चौथी पास असावा. 02) उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पूरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा : 10 मार्च 2023 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : 200/- रुपये
किती पगार मिळेल तुम्हाला?
निवड झालेल्या उमेदवारांना वेतन मेट्रिक्स पद्धतीने 15,000 ते 47,600 हजार पर्यंत पगार मिळेल व भत्ते देखील मिळतील.

मुलाखत दिनांक : 27 मार्च 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400001.

उमेदवारांनी अर्जासोबत या छायांकित प्रति सादर कराव्यात.
१) जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला
२) शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक
३) शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र
४) जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे (कमीत कमी ५ वर्षांपासून ओळखत असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( त्यांचा हुद्दा, पत्ता व फोन नंबर सह) (जाहीरातीसोबत परिशिष्ट ‘ब’ नमुन्यात)
५) स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला ६. स्वयंपाकाचा विशेषतेसंबंधीचा दाखला (असल्यास)
७) सक्षम अधिका-याने प्रदान केलेला जातीचा दाखला
८) महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
९. अर्जदाराने त्याला बनवता येणाऱ्या खाद्य पदार्थांची यादी सोबत जोडावी
१०) उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला
११) विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला
१२) सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा