बोलेरोने दुचाकीला उडवले : धरणगावतील तरुण जागीच ठार
जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । भरधाव बोलेरोच्या धडकेने धरणगावातील दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला तर सहकार मित्र गंभीर जखमी झाला. या प्रकरणी बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल
धरणगाव तालुक्यातील पष्टाणे येथील दोघे दुर्गेश जिनिंगमध्ये कामाला होते. ते धरणगावातून बाजार करून सायकलने घरी पष्टाणे येथे जात असताना याचवेळी गंगापुरी ते पष्टाने दरम्यान सोनवदकडून येणार्या बोलेरोने त्यांच्या मोटारसायकलला समोरुन धडक दिल्याने तरुण सागर रमेश देवरे (21) हा जागीच ठार झाला तर अमोल भरत पाटील (20) गंभीर जखमी झाला. अमोलवर जळगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत धरणगाव पोलिस ठाण्यात बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मयत सागरच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परीवार आहे. पुढील तपास हवालदार ईश्वर शिंदे हे करीत आहेत.