⁠ 
गुरूवार, फेब्रुवारी 29, 2024

जळगावातील मेहरूण तलावात परप्रांतीय तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२३ । जळगाव शहरातील मेहरूण तलावात २५ वर्षीय परप्रांतीय तरूणाचा मृतदेह तलावात तरंगतांना आढळून आला. रामबाबूराय जगनराय यादव (वय २५, मूळ रा. बिहार, ह. मु. सुप्रिम कॉलनी) असे मयत परप्रांतीय तरुणाचे नाव असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बिहार येथील रामबाबूराय यादव हा तरुण शहरातील सुप्रिम कॉलनीत वास्तव्यास होता. एमआयडीसी परिसरातील गणेश ॲल्युमिनिअर या कंपनीत त्याचा पुतण्या कामाला असून रामबाबूराय हा गतीमंद असल्याने पुतण्याच त्याचा उदनिर्वाह करीत होता.

मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गणेश घाट परिसरात रामबाबूराय याचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आला. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोहेकॉ रतिलाल पवार यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रतिलाल पवार हे करीत आहे.