---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा बोदवड

चोरीच्या पाच दुचाकींसह तरुणाला अटक, बोदवड पोलिसांची कारवाई

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । दुचाकी चोरीच्या प्रकरणी बोदवड पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून एकूण पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. अ‌विनाश बोदडे असे त्याचे नाव असून तो शेलवड येथील रहिवासी आहे.

crime 31 jpg webp

दुचाकी चोरी बाबत शेख सिकंदर शेख मुख्तार (रा.हिदायत नगर, बोदवड) यांनी ७ जानेवारीला बोदवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्याबाबत पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी अविनाश बोदडे (वय २७, रा.शेलवड ह.मु.लपाली ता.मोताळा जि.बुलडाणा) याला ३ फेब्रुवारीला ताब्यात घेतले. त्याला संबंधित गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याने गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी (क्रमांक एमएच.१९-एएफ.४७०७) काढून दिली. यानंतरच्या तपासात त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. गुन्ह्याचा तपास हवालदार रवींद्र गुरचळ करत आहे.

---Advertisement---

यांनी केली कारवाई

बोदवडचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सुधाकर शेजुळे, रवींद्र गुरचळ, वसंत निकम, शशिकांत शिंदे, मुकेश पाटील, दिलीप पाटील, मनोहर बनसोडे, ईश्वर पाटील, शशिकांत महाले,

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---