जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. १७ जागासाठी पार पडलेल्या मतदानात ६ जागांचे निकाल जाहिर झाले असून यात राष्ट्रवादीने तीन, तर शिवसेना २ आणि भाजपने एका जागेवर विजय मिळविला आहे.

प्रभागनिहाय निकाल :
प्रभाग क्रमांक १ मधुन शिवसेनेच्या रेखा सोनू गायकवाड यांनी विजय मिळविला. त्यांना ४६६ मते मिळालीत तर त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमीला संजय वराडे (मते २७९) यांना पराभूत केले.
प्रभाग क्रमांक २ मधुन राष्ट्रवादीचे कडूसिंग पांडुरंग पाटील हे ३३७ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सचिन सुभाष देवकर (मते २३३) यांना पराभूत केले.
प्रभाग क्रमांक ३ मधुन राष्ट्रवादीच्या योगीता गोपाळ खेवलकर यांनी विजय मिळविला. त्यांना ४०५ मते मिळाली. तर शिवसेनेच्या सुजाता खेवलकर यांना ३८५ आणि भाजपच्या कविता जैन यांना १६४ मते मिळालीत.
प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादीचे सैयद सईदाबी रशीद या ५११ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेचे कुरेशी सलीमाबी शेख कलीम २११ मते यांना पराभूत केले.
प्रभाग क्रमांक ५ मधून गोपाळ बाबूराव गंगतीरे आणि भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना समसमान ३७४ मते मिळाली आहेत.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेनेच्या पूजा प्रितेश जैन या ३०२ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या सरीता संदीप जैन (मते २९६) यांना पराभूत केले.
हे देखील वाचा :
- Gold Silver Rate : जळगावात चांदी ३९००, तर सोने १५०० रुपयांनी महागले, आताचे प्रति तोळ्याचा दर पहा..
- 10वीच्या निकालात गोदावरी इंग्लिश मीडियम CBSE स्कूलचे उज्वल यश!
- डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी.बी.एस.ई स्कूल सावदाचे 10वी, 12वी निकालात यश
- यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात
- सोयाबीन : घरचे वाण, उतारही देई छान!