जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । बोदवड महाविद्यालयाची एन-मुक्ता संघटनेची नूतन कार्यकारणी सभा नुकतीच पार पडली. यात अध्यक्षपदी डॉ.रुपाली तायडे तर सचिवपदी डॉ.माधव वराडे यांची निवळ करण्यात आली.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंग सलंग्ननित कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षक संघटना (एन-मुक्ता) संघटनेची कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड येथील स्थानिक शाखेची नूतन कार्यकारणी घोषित करण्यासाठी सभा ६ रोजी येथील महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विनोद चौधरी हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव जिल्हा सचिव डॉ.अजय पाटील यांनी केले. सभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली.
पदाधिकारी असे अध्यक्ष डॉ. रुपाली तायडे, उपअध्यक्ष नितेश सावदेकर, सचिव डॉ. माधव वराडे, सहसचिव कंचन दमाडे, खजिनदार डॉ. गीता पाटील, जिल्हा प्रतिनिधी डॉ. अनिल बारी, केंद्रीय प्रतिनिधी डॉ. विनोद चौधरी, महिला प्रतिनिधी हेमलता कोटेचा, प्रा. डॉ. कामिनी तिवारी, प्रसिद्धी प्रतिनिधी डॉ. रुपेश मोरे, तर सदस्य म्हणून डॉ. अजय पाटील, डॉ. चेतन शर्मा, नरेंद्र जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली.
संघटनेच्या माध्यमातून तसेच सर्वांच्या सहकार्याने आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करील असे प्रतिपादन नूतन अध्यक्ष डॉ. रुपाली तायडे यांनी सभेला संबोधित करताना म्हटले. डॉ. अजय पाटील यांनी संघटनेच्या जळगाव येथे 2 जानेवारीला झालेल्या सुकानू समितीचे इतिवृत्त स्थानिक शाखेला कळविले. यावेळी नूतन कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला. तसेच एन-मुक्ता संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. नितीन बारी, केंद्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक किशोर पाठक, केंद्रीय सचिव डॉ. अविनाश बडगुजर तसेच जिल्हाध्यक्ष डॉ. प्रज्ञा जंगले मॅडम व सचिव डॉ. अजय पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या असे प्रसिद्धी प्रतिनिधी डॉ. रुपेश मोरे यांनी कळविले.
हे देखील वाचा :
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित
- जळगावच्या ज्येष्ठ नागरिकांना आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची संधी, ६ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
- दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
- ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी