जळगाव जिल्हायावल

यावलात निळे निशाण समाजिक संघटनेचे आंदोलन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल पंचायत समिती समोर शुक्रवारी निळे निशाण सामाजिक संघटने कडून आंदोलन करण्यात आले. त्यात विविध गावातील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करणे, दलीत वस्ती सुधार योजनेतील अखर्चीक निधीसह विविध मागण्यांचे निवेदन पंचायत समितीकडे देण्यात आले.

शुक्रवारी येथील पंचायत समिती समोर निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वात निर्दशने करण्यात आली व पंचायत समितीकडे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, तालुक्यात विविध गावात जे कुटुंबीय अनेक वर्षांपासुन सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहत आहे. त्यांचे अतिक्रमण नियमाकुल करून ग्रामपंचायतीच्या नमुना ८ मध्ये लावणे आवश्यक होते. मात्र, अद्यापही लावण्यात आले नाही. त्यामुळे तात्काळ अतिक्रमण नियमाकुल करून त्यांना घरकूलाचा लाभद द्यावा, तसेच दलीत वस्तीतील नित्कृष्ट दर्जेच्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहे.

यावेळी निळे निशान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर, जिल्हा नियोजन समिती प्रमुख महेश तायडे, उपप्रमुख सदाशिव निकम, रोजगार मंचचे जिल्हा प्रमुख युवराज सोनवणे, जिल्हा उपप्रमुख अशोक तायडे, विभागीय प्रमुख भगवान अढाळे, उपप्रमुख शांताराम तायडे, महिला मंचच्या नंदाताई बाविस्कर, लक्ष्मीताई मेढे, तालुकाध्यक्ष विलास भास्कर, उपाध्यक्ष अब्दुल सलाम, युवक तालुकाध्यक्ष विशाल तायडे, प्रमोद पारधे, सुभाष तायडे, गणेश भालेराव, हिफाजत तडवी, लियाकत तडवी, सैय्यद शोएब महेमुद अली, भिकारी तडवी, शेख शरीफ, इकबाली तडवी तसेच तालुक्यातील मारूळ, हिंगोणा, कोळवद, अट्रावल, अंजाळे सह विविध गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Related Articles

Back to top button