⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

“शावैम” मधील उपचारपद्धती चांगली : महापौर जयश्री महाजन

0
mayor jayashree mahajan called on dr

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना दिली जाणारी उपचार पद्धती खूप  चांगली आहे. येथील कोविडबाधित रुग्णांसाठी व्यवस्थापन उत्तम दिसत असल्याचे प्रतिपादन जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार दि.२९  रोजी सकाळी महापौर जयश्री महाजन यांनी कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद व शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांची भेट घेतली.

प्रसंगी त्यांनी रुग्णालयातील व्यवस्थापन कसे चालते याची माहिती घेतली. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून वॉर्डांची पाहणी केली. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी रुग्ण प्रवेश प्रक्रिया, त्यांना दिली जाणारी वैद्यकीय व रुग्णालयीन सेवा, भोजन सेवेची माहिती दिली. भोजन कक्षासाठी  आहारतज्ज्ञांचा समावेश असलेली समिती कार्यरत आहे. जीएमसीच्या उत्तम सेवेमुळे गरीब लोकांना आर्थिक झळ बसत नाही. केवळ अत्यवस्थ व गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल असतात, असेही डॉ. रामानंद यांनी सांगितले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ.विलास मालकर उपस्थित होते.

कोविड काळात सेवा देणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करू नये

0
eknath khadse rajendra tope

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । राज्यात एकही बीएएमएस कंत्राटी, तदर्थ वैद्यकीय अधिकारी कार्यामुक्त करण्यात येणार नाही अशी आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांचे चर्चेव्दारे आश्वासन बीएएमएस तदर्थ / कंत्राटी  वैद्यकीय अधिकारी यांना कार्यामुक्त करू नये याकरिता जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या नेतृत्वाखाली  संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ अभिषेक प्रमोद ठाकूर, व पदाधिकारी यांनी माजी मंत्री एकनाथरावज खडसे यांना निवेदनाद्वारे केली होती. 

राज्यात माहे जुन 2019 पर्यंत बी.ए.एम.एस.आर्हताधारक डॉक्टर्स हे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अस्थायी वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होते. सदरील अस्थायी बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी यांचे समावेशनानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी यांचे पद रीक्त झाले, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेपर्यंत आरोग्य सेवा पोहचवण्यास प्रशासनाला खुप अडचणी यायला सुरुवात झाली, त्यानंतर शासनाच्या म्हणन्यानुसार प्रयत्न करुनही रीक्त पदी एम.बी.बी.एस. आर्हताधारक उमेदवार मिळत नसल्याने अशा ठीकाणी (गट-अ पदावर)  बी.ए.एम.एस. आर्हताधारक वैद्यकीय अधिकारी यांची तदर्थ / कंत्राटी वैद्यकीय अधिकारी गट-अ म्हणुन सन 2018-2019 मध्ये सदरील रिक्त पदे भरण्यात आली. त्यानंतर माहे मार्च-एप्रिल 2020 दरम्यान राज्यात सर्वत्र कोरोना साथ उद्रेकाला सुरुवात झाली, कालांतराने त्याचे कोरोना महामारीमध्ये रुपांतर होऊन संपुर्ण राज्यात हाहाकार माजला. सदरील कोरोना महामारीत आरोग्य यंत्रणेतील सर्वच डॉक्टरांसोबत बी.ए.एम.एस. आर्हताधारक तदर्थ/ कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील स्वत:च्या जिवाची परवा न करता प्रा आ केंद्राचे नियमीत कामकाज सांभाळुन कोवीड संशयीतांचे स्वॅब टेस्टीग, बाधीत कार्यक्षेत्रात सहवासीतांचे कोन्टॅक्ट ट्रेसींग वेळप्रसंगी कोवीड केअर सेंटर (सी.सी.सी./डी.सी.एच.सी.) व संपुर्ण कोवीड साथउद्रेकात अहोरात्र रुग्णसेवा केली आहे किंबहुना करत आहेत.

त्याचप्रमाणे माहे मे-जुन 2020 दरम्यान शासनाकडुन बंधपत्रित (बॉण्डेड) / कंत्राटी एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ केली गेली परंतु त्यात समान व सारख्याच जोखमीचे काम करणाऱ्या बी.ए.एम.एस. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कुठलीही वेतनवाढ न देता नेहमी प्रमाणे उपेक्षीत ठेवण्यात आले. तरी देखील कोरोना साथ उद्रेकाच गांभीर्य व कर्तव्याची जाणीव ठेऊ शासनाच्या अडचणीच्या काळात बी.ए.एम.एस. तदर्थ/कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुठलेही आंदोलन कीवा शासनाला वेठीस न धरता अहोरात्र सेवा दिली आहे, व देत आहेत. परंतु मागील 4 ते 5 दिवसापसुन कोवीड योदधा म्हणुन संबोधल्या जाणा-या बी.ए.एम.एस. तदर्थ् / कंत्राटी वैदकिय अधिका-यांच्या पदस्थापनेच्या / नियुक्तीच्या ठिकाणी एम.बी.बी.एस. बंधपत्रीत वैद्यकीय अधिका-यांना नियुक्ती देवुन बी.ए.एम.एस. तदर्थ/कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त / सेवामुक्त करण्यात येत आहे यामुळे त्यांचेवर खुप मोठा अन्याय होत आहे , भविष्यात सदरील एम बी बी एस बंधत्रीत वै.अ.उच्च शिक्षणासाठी अथवा बंधपत्रीत कालावधी संपल्यानंतर सेवेतुन कार्यमुक्त झाल्यावर सबंध महाराष्ट्रातील प्रा आ केंद्राची  आरोग्य सेवा पुन्हा व्हेन्टीलेटरवर जाण्याची शक्यता आहे. तसेच तसेच बी ए एम एस आर्हताधारक तदर्थ / कंत्राटी वै.अ. यांनी  कोरोना  महामारीत आरोग्य सेवेला दिलेले  योगदान  लक्षात घेता त्यांच्या नियुक्तीचे ठिकाणी  बंधपत्रीत एम बी बी एस वै.अ.यांना नियुक्ती देण्यात येवु नये अथवा नियुक्ती दिली.

तरी त्या ठिकाणी  कार्यरत  बी ए एम एस  वै.अ. यांना  कार्यमुक्त करण्यात येवु नये अशी विनंती संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.अभिषेक ठाकूर, राज्य उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय साळुंखे, व इतर 15 जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या स्वाक्षरी असलेले निवेदन, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा adv रोहिणी खडसे खेवलकर  यांच्या नेतृत्वाखाली मा.मंत्री एकनाथरावजी खडसे यांना देण्यात आले. त्याअनुषंगाने मा एकनाथरावजी खडसे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री मा.राजेशजी टोपे साहेबांशी फोनवर संवाद साधून करण्यात आली. यावेळी मागील 2 वर्षांपासून BAMS कंत्राटी / तदार्थ वैद्यकीय अधिकारी यांना ग्रामीण भागात उत्तम प्रकारे आरोग्य सेवा बजावलेली आहे, तसेच मागील 1 वर्षांपासून कोरून साथ उद्रेकामध्ये ज्यावेळी शासनाकडे आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टर उप्लब्ध होत नव्हते अश्या कालखंडात BAMS गट अ वैद्यकीय अधिकारी यांनी किन्टॅक्ट ट्रेसिंग, सबब टेस्टिंग, सी सी सी / डी सी एच सी येथे रुग्णसेवा दिलेली आहे, आणि देत आहे व भविष्यात देखील देतील या योगदानाची जाणीव ठेवून आपण राज्यातील BAMS गट अ वैद्यकीय अधिकारी यांना कार्यामुक्त करू नये अशी मागणी एकनाथ खडसे यांनी राजेश टोपेंकडे केली. सदरील बाब आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सकारात्मकतेने घेऊन राज्यातील एकही BAMS कंत्राटी / तदार्थ वैद्यकीय कार्यामुत होणार नाही असे आश्वासन दिले आहे.

सावदा पालिकेची विशेष सभा संपन्न ; 6 विषयांना मंजुरी

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । सावदा नगर पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा दि 29 रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली यावेळी अध्यक्ष स्थानी नगराध्यक्षा  अनिता येवले या होत्या

सभे समोर एकूण 6 विषय मांडण्यात आले प्रथम मागील प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात आले, तर विषय क्रमांक 1 खंडेराव देवस्थान क वर्ग तीर्थस्थळाचा विकास योजने  अंतर्गत सभामंडप बांधकाम करणेसाठी नाहरकत, व देखभाल  दुरुस्ती करणे बाबत विचार करणे, विषय 2, 15 वा वित्तआयोगातून काम करण्यास मंजुरी, सफाई कर्मचारी यांच्या स्वेच्छा निवृत्ती, व कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरणास मंजुरी देणे व कोरोना चे अनुषंगाने शहरातील नागरिकांना क्रीटीकल केअर सेंटर CCC येथे पोहचविण्यासाठी भाडे तत्वावर अँबूलन्स गाडी भाड्याने घेणे बाबत विचार करणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी सौरभ जोशी, नगरसेवक, नगरसेविका आदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या घटतेय ; आज ११०३ कोरोनामुक्त

0
corona update

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर असून गुरुवारी पुन्हा नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक आहे. आज गुरुवारी दिवसभरात १०६३ नवे रुग्ण आढळून आले तर ११०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या २४ तासांत २१ जणांचा बळी गेला.

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाची गेल्या महिन्यात वाढलेली तीव्रता आता तीन आठवड्यांपासून काहीअंशी कमी होत आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. आज गुरुवारी तब्बल ११ हजार ६६३ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०६३ नवे बाधित आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख २० हजार ९९७ वर पोचली. तर ११०३ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ८ हजार १२९ झाला आहे. २१ जणांच्या मृत्युने बळींची संख्या २१६३ वर पोचली आहे. अद्यापही मृत्यूदर १.७९ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात सध्या १० हजार ७०५ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जळगाव शहरात १६७, जळगाव ग्रामीण २१, भुसावळ ९३, अमळनेर २०५, चोपडा ९०, भडगाव ९, पाचोरा ४७, धरणगाव २०, यावल २८, एरंडोल ८६, जामनेर १२६, रावेर ४६, पारोळा १९, चाळीसगाव ७४, मुक्ताईनगर ०२, बोदवड २३, अन्य जिल्ह्यातील ७ असे एकूण १०६३ रुग्ण आढळून आले आहे.

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला ; जाणून घ्या नियम

0
lockdown

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । राज्यातील  ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेला लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्य सचिव सीताराम कुटे यांनी आज याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १५ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदीसह आता लागू असलेले सर्व निर्बंध कायम राहणार आहेत. याबाबत राज्य सरकारकडून गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.

राज्यात १४ एप्रिलपासून सरकारने कोरोनाबाबतचे निर्बंध लागू केले होते. त्यामध्ये २२ एप्रिलपासून लॉकडाउनच्या कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला होता. आधीच्या आदेशांनुसार हे निर्बंध १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच लागू असणार होते. मात्र, राज्यातील रुग्णवाढीचा दर आणि मृतांची वाढतच जाणारी संख्या पाहाता लॉकडाउनमध्ये १५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 

 

नियमावलीत नेमके नियम कोणते?

1. 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन

2. 15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन

3. सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद

4. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद

5. राज्यात जिल्हा बंदी लागू

6. अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद

7. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी

8. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी

9. सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालणार

10. एसटी बस वाहतूक 50% क्षमतेनं सुरू राहणार

11. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा

12. खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10 हजार दंड

13. सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती

14. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं 15% हजेरीनं चालणार

15. लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी

16. लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार

17. बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार

18. होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक

19. कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार

20. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार

तरसोद शिवारात शेताला आग, अग्निशमनदलाची धाव

0
tarsod farmer fire

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । जळगाव तालुक्यातील तरसोद शिवारातील पॉली हाऊस शेजारील शेताला आग लागल्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडलीय. शेताच्या बांदाला लागून असलेला पॉली हाऊस थोडक्यात वाचले आहे. तरी आगीमुळे पॉली हाऊसचा एका बाजूकडील नेट जळाला आहे.

याबाबत असे की, तरसोद शिवारातील पॉली हाऊस शेजारील शेताला आज दुपारी आग लागली आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाने घटनास्थळ गाठत आगीला आटोक्यात आणली. यावेळी देविदास सुरवाडे,रोहिदास चौधरी, जगदीश खडके,वसंत कोळी नितीन बारी यांनी आग आटोक्यात आणली.

पाचोरा शहरात ‘माझं कुटुंब माझी’ जवाबदारी मोहीम गतीत सुरु

0
pachora (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । पाचोरा शहरात दि. 28 एप्रिल पासून ते 2 मे परियंत चालणार असलेल्या माझं कुटुंब माझी जवाबदारी ही मोहीमेची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यात शहारात वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता शहरातील नागरिकांचे घरो घरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.

या सर्वेक्षणात शहरातील पहिल्या दोन दिवसात 28,29 एप्रिल 955 घरातील 4775 नागरिकाचे सर्वेक्षण झाले आहे. एखायाद्या नागरिक वाटत असेल की कोरोना बाधित आहे. त्याला तात्काळ हुतात्मा स्मारक येथे कोरोना टेस्ट करता पाठवले जात आहे. जर कोरोना बाधित नागरिक असल्यास त्याला बामरूड येथील कोविड सेंटरला पाठवले जात आहे.नगरपालिका, पाचोरा ग्रामीण रुग्णालय, याच्या अंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे. यात 20 टीम बनवल्या आहे. एका टीम मध्ये एक अशा ताई, आरोग्य सेविका/सेवक,शिक्षक अशी तीन कर्मचाऱ्यांची टीम बनवली आहे.

या सर्व मोहिमेचे संचालन व सहकार्य-
पाचोरा नगरपालिका ‘सी.ई. ओ ‘ शोभा बाविस्कर, भोसले साहेब, पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ पाचोरा शहरी प्राथमिक आरोग्य अधिकारी बाहेरपुरा डॉ. सुनील गवळी,व आरोग्य सेविका भारती पाटील, आकाश ठाकूर व इतर कर्मचारी घरो घरी जाऊन मोहिमेत काम करत आहेत.

जळगाव जिल्ह्यात ‘कोविड संक्रमित नागरीक शोध मोहिम’ कक्ष स्थापन

0
corona

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कोविड विषाणू संक्रमित नागरिकांचा शोध घेऊन त्यांचेवर जिल्हा आरोग्य विभागामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना संक्रमित नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी नेहरू युवा केंद्र संघटन, जळगाव यांच्या स्वयंसेवकांचा सहभाग असलेला “कोविड संक्रमित नागरिक शोध मोहीम कक्ष” स्थापन करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहे.

कोविड संक्रमित नागरिकांच्या शोध मोहिम कक्षात 7620170659 हा व्हॉट्सअॅप क्रमांक कार्यरत राहणार आहे. या मोबाईल क्रमांकावर जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी त्यांच्या परिसरात आढळणारे कोविड विषाणू संक्रमित नागरिक/कोविड व्हायरस स्प्रेडर्स/वाहक नागरिकांचे नाव, पत्ता इत्यादी माहिती पाठवावी. जे नागरिक अशा संक्रमित रुग्णांची माहिती पाठवतील त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. या मोबाईल क्रमांकावर येणारे कोणतेही इन्कमिंग कॉल स्वीकारले जाणार नाही.

नागरिकांनी या मोबाईल क्रमांकावर केवळ व्हॉट्सअप अथवा एसएमएस द्वारे कोविड विषाणू संक्रमित नागरिक/कोविड व्हायरस स्प्रेडर्स/ वाहक नागरिक यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक असल्यास तो पाठवावा. कोविड विषाणू संक्रमित नागरिक/कोविड व्हायरस स्प्रेडर्स/वाहक नागरिक यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची माहिती, व्हिडिओ, अफवा पसरविणारे संदेश या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास अशा प्राप्त मोबाईल क्रमांक धारकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सुजाण व जागृत नागरिकांनी आपले सामाजिक कर्तव्य समजून आपल्या परिसरातील विषाणू संक्रमित नागरिक/कोविड व्हायरस स्प्रेडर्स/वाहक नागरिक यांचे नाव पत्ता व उपलब्ध असल्यास मोबाईल क्रमांक आदि माहिती प्रशासनास देऊन विषाणूचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

पाचोऱ्यात तोंडावर मास्क लावा सांगितल्याच्या रागातून न.पा.च्या कर्मचाऱ्याला मारहाण ; नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतांना तोंडावर मास्क लावा सांगितल्याच्या रागातून नगरपालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक बागवानसह तिघांवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा येथे कोरोना महामारीची साकळी तोडण्यासाठी पालिका प्रशासन व पोलिस शहरात संयुक्त कारवाई करीत आहे. या पालीका प्रशासनाने राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ या सह तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.२६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात रफिक बागवान या नगरसेवकाने तोंडावर मास्क न लावता भाजीपाला विक्री  सुरू ठेवली होती  त्यास पालिका कर्मचारी राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ याने आपण तोंडावर मास्क लाऊन आपले काम करा असे सांगीतले होते.

त्यांनतर दोन दिवसांनी अनिल वाघ, राजेश कंडारे, पोलिस उपअधीक्षक विकास पाटील, सहाय्यक फौजदार नंदकुमार जगताप, प्रकाश पाटील, सुनिल पाटील, विजयसिंग पाटील हे दि.२८ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्तव्य बजावत असतांना त्या ठिकाणी नगरसेवक रफिक बागवान, महिद बागवान यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करुन राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ याचा हात घरुन  युसुफ कालू बागवान याचेवर दंडात्मक कारवाई का केली. तूला येथे नोकरी करावयाची आहे का नाही. तू हे चांगले केले नाही. तू पोलिसांच्या नांदी लागू नको, ते आज आहेत, उद्या नाहीत असे बोलून ज्या ठिकाणी कारवाई केली होती त्या ठिकाणी घेऊन गेले व भाजीमंडीतील युसूफ बागवान यास बोलावून यांने तूझ्यावर कारवाई केली का? असे विचारले व युसुफ बागवान याने हो सांगीतल्यानंतर नगरसेवक रफिक बागवान याने राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ याचे तोंडावरील मास काढून फेकले. व हातातील पावतीबुक फेकून दिले.

त्यानंतर तिघांनी तोंडावर व छातीवर बुक्यांनी मारहाण केली. ते अनिल वाघ हे ओक्साबोक्शी रडत असतांना तोंड दाबून ठेवले आणि शिवीगाळ करून दमदाटी केली. यावेळी माझे सोबत इतर दुकानावर कारवाई करीत असलेले सहाय्यक फौजदार नंदकुमार जगताप, सुनिल पाटील, विजयसिंग पाटील यांनी त्यांचे तावडीतून सोडविले, यामुळे पालिका कर्मचारी वाघ याने नगरसेवक रफिक बागवान यांचेसह तिघांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच नगरसेवक रफिक बागवान यांना अटक करण्यात आली आहे.युसूफ बागवान,हमीद कालु बागवान, बेपत्ता आहेत. नगरसेवक रफिक बागवान याच्यावर कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय कर्मचारी याना मारहाण व शासकीय कामत अडथळा निर्माण केल्या प्रकरणी. शासकीय कर्मचारी अनिल वाघ यांनी पाचोरा पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्या तक्रारी नुसार आरोपी वरती कलम -353,332,504,506(34),268,269. नुसार कारवाई करण्यात आली आहे व पाचोरा पोलीस स्टेशन चे ‘पी. आय ‘ किसनराव नजन पाटील -जर कोणी शासकीय कर्मचाऱ्या सोबत असे कृत्य केल्यास सक्त कारवाई केली जाईल