⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय इमारत आवारातील ध्वजारोहण रद्द

0
flag

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी (BREAK THE CHAIN) व सदर विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 13 एप्रिल, 2021 च्या आदेशान्व्ये दि. 1 मे, 2021 च्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बध लागु केलेले आहेत.

कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच, अत्यंत साधेपणाने साजरा करणेबाबत प्राप्त सुचनांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापनदिन समारंभ 1 मे, 2021 प्रशासकीय इमारत टप्पा क्र-3 च्या प्रांगणात साजरा करण्यात येणार नाही.

तरी प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी यांनी ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहु नये. असे आवाहन जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील ७ पोलिसांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

0
police

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । पोलीस प्रशासनात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जाणारे पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जळगाव जिल्ह्यातील ७ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना जाहीर झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील जिल्हा विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी राजाराम पाटील,  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लिलाकांत महाले, स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार सुनील दामोदरे, पोलीस नाईक संदीप साळवे, आर्थिक गुन्हे शाखेतील हवालदार शशिकांत पाटील, जळगाव उपविभागीय कार्यालयातील हवालदार विजय काळे, मारवाड पोलीस ठाण्यातील हवालदार महेश पाटील यांना सन्मान चिन्ह जाहीर झाले आहे.

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढविला

0
lockdown

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी 14 एप्रिल, 2021 च्या आदेशान्वये संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी दिनांक 1 मे, 2021 रोजी सकाळी 7 वाजेपावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 सह विशेष निर्बध लागू करण्यात आलेले आहेत. तर 20 एप्रिल, 2021 अन्वये सुधारीत विशेष निर्बध लागू करण्यात आलेले आहेत. संपूर्ण जळगाव जिल्ह्याकरीता लागू करण्यात आलेले संचारबंदीसह विशेष निर्बध दिनांक 15 मे, 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपावेतो वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

या आदेशानुसार लागू करण्यात आलेल्या निर्बधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलिस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

मैत्रीचा विश्‍वासघात ; चाळीसगावात मित्राच्याच पत्‍नीवर केला अत्याचार

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना चाळीसगाव शहरातून समोर आली आहे. शहरातील २२ वर्षीय विवाहितेवर पतीच्या मित्रानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी रात्री घडला. मित्राच्या पत्‍नीला तुझे अश्‍लिल व्हिडीओ असल्‍याचे सांगून ते डिलीट करायचे असतील तर भेटायचा ये; असे सांगून बोलावले आणि विवाहितेवर अत्‍याचार केल्‍याची घटना उघडकीस आली.

याबाबत असे की, चाळीसगाव शहरातील घाट रोड परिसरात पती, पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास आहेत. भंगारचा व्यावसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीतो. त्‍यांच्याच परिचयातील मित्र नेहमी घरी येत असे. गुरूवारी (ता.२९) रात्री आठच्या सुमारास मित्र भांडी आणण्यासाठी घरा बाहेर गेला होता. याच दरम्‍यान त्याचा मित्र निजाम शेख जकीउद्दीन मुजावर (रा. कादरीनगर) याने त्याच्या पत्नीला फोन करून तुझे अश्‍लीत व्हिडीओ व फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहेत. ते डिलीट करायचे असतील तर पाण्याच्या टाकीच्या पाठीमागील शेतात ये असे धमकावत विवाहितेला बोलावले.

संबंधीत विवाहित महिला रात्री साडेआठच्या सुमारास निजाम शेख याने बोलाविलेल्‍या ठिकाणी गेली. त्‍यावेळी निजाम शेख याने मोबाईल न दाखवता महिलेवर अत्याचार केला. याच दरम्‍यान विवाहितेचा पती आल्‍याने मुजावरने तेथून पलायन केले. यानंतर पिडीतेने लागलीच पतीसह शहर पोलिस स्टेशनला जात फिर्याद दिली. यानुसार निजाम शेख जकीउद्दीन मुजावर याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

व्हिडीओ : कानळदा येथे लसीकरण केंद्राच्या बाहेर जाऊन दिल्या लस?

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । जळगाव तालुक्यातील कानळदा लसीकरण केंद्रातील दोघा परिचारिकांनी कोविड लस लंपास करत थेट रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनातील परिचितांना टोचून दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबतची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, व्हिडीओत परिचारिका नकार देत असल्या तरी एक अधिकारी प्रकाराला दुजोरा देत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी लसींची कमतरता आहे. लोक लसीसाठी दिवसभर ताटकळत उभे असतात. जळगाव तालुक्यातील कानळदा येथे दोघा परिचारीकांनी आज दुपारी लसी थेट रस्त्यावरील चारचाकी वाहनातील परिचितांना टोचून दिल्या. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी दोघा परिचारिकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे दोघी नर्स गोंधळल्या. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. एकीने तर मोबाईलला चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. केंद्रातून दोन व्हायल्स गायब झाल्याच्या प्रकाराला एक अधिकारी दुजोरा देत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मिडियात व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असून या प्रकाराची चर्चा सुरु आहे.

एका अधिकाऱ्याने लसीच्या व्हायल्स गायब असल्याचे मान्य केले असले तरी परिचारिका मात्र नंतर ते मान्य करीत नसल्याचे सांगत आहे. जर लस खरोखर गायब झाल्या असतील तर त्याचा ताळमेळ साधण्यासाठी इतरांना कमी लस दिली असावी किंवा लस ऐवजी पाणी टोचून दिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासन या प्रकारात किती लक्ष घालते हे पाहणे गरजेचे आहे.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/479917073288669/

यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना

0
jalgaon collector office

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेवून राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार असून सदर कार्यक्रम 1 मे, 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत अवर सचिव राजेंद्र गायकवाड यांनी याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी व या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 15 मे, 2021 पर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. या तरतूदी विचारात घेवून राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने विविध निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा मुख्यालयात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8.00 वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात येईल.

या ठिकाणी केवळ पालकमंत्री, महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त एवढ्याच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये. तसेच कवायती/संचलन आयोजन करण्यात येवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे, अशाही सूचनाही परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

कहेकशा परवीन एमबीबीएस उत्तीर्ण ; मानियार बिरादरीच्या कोविड सेंटरला भेट व सत्कार

0
maniyar biradari jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील मेहरून भागातील रहिवासी व जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे एमबीबीएसचे शिक्षण घेणारी कहेकशा परवीन विकार अहेमद  ही एमबीबीएस ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होताच तिने औरंगाबाद हुन येऊन मानियार बिरादरी च्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सुरू असलेल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल ला भेट देऊन रुग्णांची पाहणी करून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.

यावेळी बिरादरीचे अध्यक्ष तथा हॉस्पिटल चे  मुख्य समन्वयक फारुक शेख यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन  अभिनंदन केले. यावेळी तिचे वडील विकार अहेमद, कोविड सेंटर चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रियाज बागवान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एजाज खान , डॉ मोहसीन शेख, व्यवस्थापक रइस शेख आदी उपस्थित होते.

कहेकशा परवीन ही जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवानिवृत्त मेडिकल स्टोर इन्चार्ज सगीर अहमद यांची नात असून, के परविन मेडिकल स्टोर चे संचालक विकार अहमद( गुड्डू) यांची मुलगी आहे तर डे नाईट मेडिकल स्टोर चे संचालक इफ्तेखार अहेमद(समी) यांची पुतणी आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे

जळगाव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज

0
rain in maharashtra

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील तापमानात चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचा पारा ४५ अंशांपर्यंत वाढला आहे.  दिवसेंदिवस तापणाऱ्या उन्हांमुळे जळगावकर चांगलेच त्रासले आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, सायंकाळच्या वेळेस जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. त्यात गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त आहेत. तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत पोहोचला आहे, त्यातच जिल्ह्यात १८ ते २० कि.मी. वेगाने उष्ण वारे वाहत असल्याने घरात थांबनेदेखील कठीण झाले आहे. विशेष म्हणजे सकाळी ९ वाजेपासून उन्हाची तीव्रता जाणवत असून, रात्री १० वाजेपर्यंतदेखील उष्णतेचा झळा कायम असल्याने, नागरिकांचे उकाड्यामुळे हाल होत आहेत. मात्र, जिल्ह्यात पावसाने हजेरी लावण्यास तापमानात काहीअंशी घट होऊन पारा ३८ अंशापर्यंत येण्याचाही अंदाज आहे. मात्र, पुढील आठवड्यापासून पुन्हा तापमानात वाढ होऊन पारा ४५ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, सद्य:स्थितीत दक्षिण मध्यप्रदेश व विदर्भ या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या आर्द्रयुक्त हवेमुळे जिल्ह्यात आगामी तीन दिवस अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. सायंकाळच्या वेळेस जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह काही भागांत वादळी पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार जिल्ह्यात पावसाची शक्यता ४५ टक्के इतकी आहे.

जळगावात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील पिंप्राळा पसिरातील शिंदे नगरातील एका महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. कविता प्रवीण लोखंडे (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कविता यांनी राहत्या घरात कॉटवर लाकडी स्टूल ठेऊन ओढणीने गळफास घेतला. गुरुवारी सकाळी १० वाजता हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यांनी कविता यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.

रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी दामोदार लोखंडे यांनी दिलेल्या खबरीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुनील पाटील हे करीत आहे.