जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ मे २०२१ । स्व.निखिल एकनाथराव खडसे यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आदिशक्ती मुक्ताई सह सूतगिरणी येथील “निखिलभाऊ खडसे स्मृतिस्थळ” येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गुरुनाथ खडसे आणि जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील यांच्याहस्ते स्व. निखिल खडसे यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सुचने नुसार ब्लड फॉर महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्व निखिलभाऊ खडसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगर तर्फे रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
135 रक्तदात्यांनी केले रक्तदान
यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या स्व.निखिलभाऊ खडसे यांचा आदिशक्ती मुक्ताई सह सूतगिरणीच्या उभारणीत महत्वाचा वाटा होता. स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा हे त्यांचे स्वप्न होते सूतगिरणीच्या माध्यमातून ते पुर्ण होत आहे. निखिल भाऊ जि.प. सदस्य असताना त्यांनी उत्कृष्ठ कार्य केले.त्यांच्यात असलेल्या संघटन कौशल्या द्वारे त्यांनी युवकांचे मोठे संघटन उभे केले होते.
समाजातील प्रत्येक लहान थोर मंडळी सोबत त्यांचा संपर्क होता. प्रत्येक व्यक्ती सोबत ते कुठलाही अहंकार न बाळगता सदैव जिव्हाळ्याने संवाद साधत असत. प्रत्येकाच्या सुख दुःखात,गरजेच्या काळात धावून जात असत त्यांनी दाखवलेल्या समाजसेवेच्या मार्गावर आज आम्ही चालत आहोत. कोरोना काळात राज्यात भासत असलेला रक्ताचा तुटवडा दुर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ब्लड फॉर महाराष्ट्र अभियान चालवले जात आहे त्या अंतर्गत स्व निखिलदादा खडसे यांच्या स्मृती दिना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कोरोना सारख्या महामारीत रक्तसाठ्याची मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजु रुग्णांना रक्त उपलब्ध होईल स्व निखिल भाऊंना हिच खरी श्रद्धांजली ठरेल. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन बाळगून स्व.निखिल खडसे यांना श्रद्धांजली वाहिली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, माजी आमदार मनिष जैन, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, नगराध्यक्ष नजमा तडवी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु डी पाटील,युवक कार्याध्यक्ष दिपक पाटील,युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, सुनिल कोंडे,जि प सदस्य निलेश पाटील, वैशाली तायडे, माजी जि प सदस्य सुभाष पाटील,बारसु खडसे,अशोक लाडवंजारी,अशोक पाटील, सुनिल माळी,प स सदस्य किशोर चौधरी,माजी सभापती राजेंद्र माळी,विलास धायडे, नगरसेवक निलेश शिरसाट, बापु ससाणे,ललित महाजन,प्रवीण पाटील,माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील,महिला तालुकाध्यक्ष लता ताई सावकारे, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, प्रदिप साळुंखे,संदिप देशमुख,योगेश कोलते,अतुल पाटील,शिवराज पाटील, विशाल महाराज खोले, विनोद सोनवणे,डॉ अभिषेक ठाकुर,व्हि सी चौधरी, संजय चौधरी, मनोज तळेले, संजय कपले,पांडुरंग नाफडे,चेतन राजपुत,सदानंद उन्हाळे,सुनिल काटे, सुभाष खाटीक, सोपान कांडेलकर,पप्पु बोराखडे, दिपक साळुंखे, हर्षल झोपे,राजेंद्र कापसे,मुन्ना बोडे, राजेश ढोले, प्रविण दामोदरे, सुशील भुते ,कल्पेश शर्मा, गोपाल गंगतिरे, प्रदिप बडगुजर, किरण वंजारी, रवी खेवलकर,दिलीप पाटील ,संजय माळी ,अक्षय माळी,शरीफ मेकॅनिकल उपस्थित होते.