⁠ 
रविवार, नोव्हेंबर 10, 2024

जळगाव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज

0
rain in maharashtra

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील तापमानात चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचा पारा ४५ अंशांपर्यंत वाढला आहे.  दिवसेंदिवस तापणाऱ्या उन्हांमुळे जळगावकर चांगलेच त्रासले आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, सायंकाळच्या वेळेस जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. त्यात गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त आहेत. तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत पोहोचला आहे, त्यातच जिल्ह्यात १८ ते २० कि.मी. वेगाने उष्ण वारे वाहत असल्याने घरात थांबनेदेखील कठीण झाले आहे. विशेष म्हणजे सकाळी ९ वाजेपासून उन्हाची तीव्रता जाणवत असून, रात्री १० वाजेपर्यंतदेखील उष्णतेचा झळा कायम असल्याने, नागरिकांचे उकाड्यामुळे हाल होत आहेत. मात्र, जिल्ह्यात पावसाने हजेरी लावण्यास तापमानात काहीअंशी घट होऊन पारा ३८ अंशापर्यंत येण्याचाही अंदाज आहे. मात्र, पुढील आठवड्यापासून पुन्हा तापमानात वाढ होऊन पारा ४५ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, सद्य:स्थितीत दक्षिण मध्यप्रदेश व विदर्भ या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या आर्द्रयुक्त हवेमुळे जिल्ह्यात आगामी तीन दिवस अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. सायंकाळच्या वेळेस जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह काही भागांत वादळी पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार जिल्ह्यात पावसाची शक्यता ४५ टक्के इतकी आहे.

जळगावात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील पिंप्राळा पसिरातील शिंदे नगरातील एका महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. कविता प्रवीण लोखंडे (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कविता यांनी राहत्या घरात कॉटवर लाकडी स्टूल ठेऊन ओढणीने गळफास घेतला. गुरुवारी सकाळी १० वाजता हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यांनी कविता यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.

रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी दामोदार लोखंडे यांनी दिलेल्या खबरीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुनील पाटील हे करीत आहे.

आजचा सोने चांदीचा भाव : ३० एप्रिल २०२१

0
gold silver rate

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । सोन्याच्या भावात आज किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.  तर आज चांदीच्या भावात देखील वाढ झाली आहे.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव  १६ रुपयांनी वाढून ते ४,७७० रुपये झाला आहे. १० ग्रामचा दर ४७,७७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याच्या भावातही १५ रुपयाची वाढ झाली असून प्रति ग्राम भाव ४,५४३ रुपये इतका असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,४३० रुपये मोजावे लागतील.

आजचा चांदीचा भाव 

चांदीच्या दरात देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.  चांदीचा १ ग्राम चांदीचा भाव आज ७३.९रुपये इतका असून १ किलोचा दर ७३,००० रुपये इतका आहे. चांदीच्या दरात तब्बल ४०० रुपयांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तेथून गुंतवणूक काढून सोनेखरेदीवर भर देत आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे.

पत्रकार बांधवांच्या लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करा : आ.भोळे

0
suresh bhole

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । पत्रकार बांधवांना व्हॅकसिन लसीकरण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करण्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांनी दिले निवेदन.

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी ने थैमान घातले असुन  प्रचार ,प्रसिध्दी, ची मोलाची जबाबदारी साभाळनारे कोरोना योद्धा पत्रकार हे लोकशाही चे चवथा आधारस्तंभ  आहे.  कोरोनामुळे अनेक पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते बाधंवानचा जिव गेला असुन प्रतत्रका हे अनेक शासकीय, निमशाकि व सामाजिक कार्यक्रमांना जातात.

तसेच वृत्तपत्र विक्रेते बाधंव हे  आपला जीव धोक्यात घालून समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना वृत्तपत्र देत असतात म्हणुनच यासाठी जळगाव शहरातील  सर्व पत्रकार बाधंव, प्रेस फोटो गॉफर व  ईलेटॉनिक  मिडीया, व वृत्तपत्रे विक्रेते यांना कोरोना व्हॅकसिन लसीकरण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे भाजपा जळगाव जिल्हा अध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांनी या पत्राद्वारे केली आहे. असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

 

जळगाव जिल्ह्यास मिळणार १० ऑक्सीजन प्लांटसह रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा साठा

0
jalgaon district will get stock of remedesivir injections with 10 oxygen plants

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । एकीकडे राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असून प्रशासन याला हाताळण्यात अयशस्वी ठरले असतांना माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांनी आज मुंबई येथील उच्चस्तरीय बैठकीत जिल्ह्यासाठी पीएम केअर फंडातून तब्बल १० ऑक्सीजन निर्मिती प्लांटसह रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा मंजूर करून आणला आहे.

माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत प्रशासनाला वारंवार धोक्याचे इशारे दिले असतांनाही याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. याचमुळे आता राज्यातील स्थिती ही अतिशय चिंताजनक बनली असून जळगाव जिल्ह्यात देखील कोरोनाची स्थिती अतिशय विकोपाला गेलेली आहे. रूग्ण तडफत असतांना सत्ताधारी लोकप्रतिनिधी हाताची घडी, तोंडावर बोट या स्थितीत असतांना आ. गिरीशभाऊंनी  रूग्णांसाठी धाव घेतली आहे.

या अनुषंगाने आज मुंबई येथे आ. गिरीश महाजन यांनी अन्न व औषध प्रशासन खात्याचे आयुक्त परिमल राजीव यांच्यासोबत बैठक घेतली. याला माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी राज्यातील रूग्णांसाठी सिपला कंपनीतर्फे ३५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करण्यात आल्याची माहिती एफडीए आयुक्तांनी दिली. यातून जळगाव जिल्ह्यात वाढीव साठा मिळावा अशी मागणी आ. गिरीश महाजन यांनी केली.

यावर जळगाव जिल्ह्यास योग्य तो साठा मिळणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. तर पीएम केअर फंडातून जळगाव जिल्ह्यासाठी १० ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना देखील मंजुरी प्रदान करण्यात आली. यामुळे जळगाव जिल्ह्यातील रूग्णांना पुरेसा प्राणवायू उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांसाठी लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी आ. गिरीश महाजन यांनी दिली. तर जळगाव जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचे रिपोर्ट लवकर येत नसून या प्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी देखील त्यांनी केली.

दरम्यान, आमदार गिरीश महाजन यांनी आजच्या बैठकीची माहिती देतांना जिल्हा प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विरोधी पण रूग्णसेवेसाठी थेट मैदानात उतरले असतांना सत्ताधारी पक्षाचे मंत्री व आमदार हे मात्र होम आयसोलेशनमध्ये बध्द झालेले आहेत. आम्ही मात्र न घाबरता थेट मैदानात असून सत्ताधार्‍यांनी आता तरी शुध्दीवर येऊन रूग्णसेवा करावी असा खोचक सल्लादेखील आ. गिरीशभाऊ यांनी दिला आहे.

“शावैम” मधील उपचारपद्धती चांगली : महापौर जयश्री महाजन

0
mayor jayashree mahajan called on dr

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना दिली जाणारी उपचार पद्धती खूप  चांगली आहे. येथील कोविडबाधित रुग्णांसाठी व्यवस्थापन उत्तम दिसत असल्याचे प्रतिपादन जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार दि.२९  रोजी सकाळी महापौर जयश्री महाजन यांनी कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद व शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांची भेट घेतली.

प्रसंगी त्यांनी रुग्णालयातील व्यवस्थापन कसे चालते याची माहिती घेतली. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून वॉर्डांची पाहणी केली. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी रुग्ण प्रवेश प्रक्रिया, त्यांना दिली जाणारी वैद्यकीय व रुग्णालयीन सेवा, भोजन सेवेची माहिती दिली. भोजन कक्षासाठी  आहारतज्ज्ञांचा समावेश असलेली समिती कार्यरत आहे. जीएमसीच्या उत्तम सेवेमुळे गरीब लोकांना आर्थिक झळ बसत नाही. केवळ अत्यवस्थ व गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल असतात, असेही डॉ. रामानंद यांनी सांगितले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ.विलास मालकर उपस्थित होते.

कोविड काळात सेवा देणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करू नये

0
eknath khadse rajendra tope

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । राज्यात एकही बीएएमएस कंत्राटी, तदर्थ वैद्यकीय अधिकारी कार्यामुक्त करण्यात येणार नाही अशी आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांचे चर्चेव्दारे आश्वासन बीएएमएस तदर्थ / कंत्राटी  वैद्यकीय अधिकारी यांना कार्यामुक्त करू नये याकरिता जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या नेतृत्वाखाली  संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ अभिषेक प्रमोद ठाकूर, व पदाधिकारी यांनी माजी मंत्री एकनाथरावज खडसे यांना निवेदनाद्वारे केली होती. 

राज्यात माहे जुन 2019 पर्यंत बी.ए.एम.एस.आर्हताधारक डॉक्टर्स हे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अस्थायी वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होते. सदरील अस्थायी बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी यांचे समावेशनानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी यांचे पद रीक्त झाले, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेपर्यंत आरोग्य सेवा पोहचवण्यास प्रशासनाला खुप अडचणी यायला सुरुवात झाली, त्यानंतर शासनाच्या म्हणन्यानुसार प्रयत्न करुनही रीक्त पदी एम.बी.बी.एस. आर्हताधारक उमेदवार मिळत नसल्याने अशा ठीकाणी (गट-अ पदावर)  बी.ए.एम.एस. आर्हताधारक वैद्यकीय अधिकारी यांची तदर्थ / कंत्राटी वैद्यकीय अधिकारी गट-अ म्हणुन सन 2018-2019 मध्ये सदरील रिक्त पदे भरण्यात आली. त्यानंतर माहे मार्च-एप्रिल 2020 दरम्यान राज्यात सर्वत्र कोरोना साथ उद्रेकाला सुरुवात झाली, कालांतराने त्याचे कोरोना महामारीमध्ये रुपांतर होऊन संपुर्ण राज्यात हाहाकार माजला. सदरील कोरोना महामारीत आरोग्य यंत्रणेतील सर्वच डॉक्टरांसोबत बी.ए.एम.एस. आर्हताधारक तदर्थ/ कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील स्वत:च्या जिवाची परवा न करता प्रा आ केंद्राचे नियमीत कामकाज सांभाळुन कोवीड संशयीतांचे स्वॅब टेस्टीग, बाधीत कार्यक्षेत्रात सहवासीतांचे कोन्टॅक्ट ट्रेसींग वेळप्रसंगी कोवीड केअर सेंटर (सी.सी.सी./डी.सी.एच.सी.) व संपुर्ण कोवीड साथउद्रेकात अहोरात्र रुग्णसेवा केली आहे किंबहुना करत आहेत.

त्याचप्रमाणे माहे मे-जुन 2020 दरम्यान शासनाकडुन बंधपत्रित (बॉण्डेड) / कंत्राटी एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ केली गेली परंतु त्यात समान व सारख्याच जोखमीचे काम करणाऱ्या बी.ए.एम.एस. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कुठलीही वेतनवाढ न देता नेहमी प्रमाणे उपेक्षीत ठेवण्यात आले. तरी देखील कोरोना साथ उद्रेकाच गांभीर्य व कर्तव्याची जाणीव ठेऊ शासनाच्या अडचणीच्या काळात बी.ए.एम.एस. तदर्थ/कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुठलेही आंदोलन कीवा शासनाला वेठीस न धरता अहोरात्र सेवा दिली आहे, व देत आहेत. परंतु मागील 4 ते 5 दिवसापसुन कोवीड योदधा म्हणुन संबोधल्या जाणा-या बी.ए.एम.एस. तदर्थ् / कंत्राटी वैदकिय अधिका-यांच्या पदस्थापनेच्या / नियुक्तीच्या ठिकाणी एम.बी.बी.एस. बंधपत्रीत वैद्यकीय अधिका-यांना नियुक्ती देवुन बी.ए.एम.एस. तदर्थ/कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त / सेवामुक्त करण्यात येत आहे यामुळे त्यांचेवर खुप मोठा अन्याय होत आहे , भविष्यात सदरील एम बी बी एस बंधत्रीत वै.अ.उच्च शिक्षणासाठी अथवा बंधपत्रीत कालावधी संपल्यानंतर सेवेतुन कार्यमुक्त झाल्यावर सबंध महाराष्ट्रातील प्रा आ केंद्राची  आरोग्य सेवा पुन्हा व्हेन्टीलेटरवर जाण्याची शक्यता आहे. तसेच तसेच बी ए एम एस आर्हताधारक तदर्थ / कंत्राटी वै.अ. यांनी  कोरोना  महामारीत आरोग्य सेवेला दिलेले  योगदान  लक्षात घेता त्यांच्या नियुक्तीचे ठिकाणी  बंधपत्रीत एम बी बी एस वै.अ.यांना नियुक्ती देण्यात येवु नये अथवा नियुक्ती दिली.

तरी त्या ठिकाणी  कार्यरत  बी ए एम एस  वै.अ. यांना  कार्यमुक्त करण्यात येवु नये अशी विनंती संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.अभिषेक ठाकूर, राज्य उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय साळुंखे, व इतर 15 जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या स्वाक्षरी असलेले निवेदन, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा adv रोहिणी खडसे खेवलकर  यांच्या नेतृत्वाखाली मा.मंत्री एकनाथरावजी खडसे यांना देण्यात आले. त्याअनुषंगाने मा एकनाथरावजी खडसे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री मा.राजेशजी टोपे साहेबांशी फोनवर संवाद साधून करण्यात आली. यावेळी मागील 2 वर्षांपासून BAMS कंत्राटी / तदार्थ वैद्यकीय अधिकारी यांना ग्रामीण भागात उत्तम प्रकारे आरोग्य सेवा बजावलेली आहे, तसेच मागील 1 वर्षांपासून कोरून साथ उद्रेकामध्ये ज्यावेळी शासनाकडे आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टर उप्लब्ध होत नव्हते अश्या कालखंडात BAMS गट अ वैद्यकीय अधिकारी यांनी किन्टॅक्ट ट्रेसिंग, सबब टेस्टिंग, सी सी सी / डी सी एच सी येथे रुग्णसेवा दिलेली आहे, आणि देत आहे व भविष्यात देखील देतील या योगदानाची जाणीव ठेवून आपण राज्यातील BAMS गट अ वैद्यकीय अधिकारी यांना कार्यामुक्त करू नये अशी मागणी एकनाथ खडसे यांनी राजेश टोपेंकडे केली. सदरील बाब आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सकारात्मकतेने घेऊन राज्यातील एकही BAMS कंत्राटी / तदार्थ वैद्यकीय कार्यामुत होणार नाही असे आश्वासन दिले आहे.

सावदा पालिकेची विशेष सभा संपन्न ; 6 विषयांना मंजुरी

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । सावदा नगर पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा दि 29 रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली यावेळी अध्यक्ष स्थानी नगराध्यक्षा  अनिता येवले या होत्या

सभे समोर एकूण 6 विषय मांडण्यात आले प्रथम मागील प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात आले, तर विषय क्रमांक 1 खंडेराव देवस्थान क वर्ग तीर्थस्थळाचा विकास योजने  अंतर्गत सभामंडप बांधकाम करणेसाठी नाहरकत, व देखभाल  दुरुस्ती करणे बाबत विचार करणे, विषय 2, 15 वा वित्तआयोगातून काम करण्यास मंजुरी, सफाई कर्मचारी यांच्या स्वेच्छा निवृत्ती, व कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरणास मंजुरी देणे व कोरोना चे अनुषंगाने शहरातील नागरिकांना क्रीटीकल केअर सेंटर CCC येथे पोहचविण्यासाठी भाडे तत्वावर अँबूलन्स गाडी भाड्याने घेणे बाबत विचार करणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी सौरभ जोशी, नगरसेवक, नगरसेविका आदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या घटतेय ; आज ११०३ कोरोनामुक्त

0
corona update

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर असून गुरुवारी पुन्हा नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक आहे. आज गुरुवारी दिवसभरात १०६३ नवे रुग्ण आढळून आले तर ११०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या २४ तासांत २१ जणांचा बळी गेला.

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाची गेल्या महिन्यात वाढलेली तीव्रता आता तीन आठवड्यांपासून काहीअंशी कमी होत आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. आज गुरुवारी तब्बल ११ हजार ६६३ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०६३ नवे बाधित आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख २० हजार ९९७ वर पोचली. तर ११०३ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ८ हजार १२९ झाला आहे. २१ जणांच्या मृत्युने बळींची संख्या २१६३ वर पोचली आहे. अद्यापही मृत्यूदर १.७९ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात सध्या १० हजार ७०५ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जळगाव शहरात १६७, जळगाव ग्रामीण २१, भुसावळ ९३, अमळनेर २०५, चोपडा ९०, भडगाव ९, पाचोरा ४७, धरणगाव २०, यावल २८, एरंडोल ८६, जामनेर १२६, रावेर ४६, पारोळा १९, चाळीसगाव ७४, मुक्ताईनगर ०२, बोदवड २३, अन्य जिल्ह्यातील ७ असे एकूण १०६३ रुग्ण आढळून आले आहे.