⁠ 
रविवार, नोव्हेंबर 10, 2024

“शावैम” मध्ये एक वर्षाच्या बालकाला मृत्यूच्या दाढेतून आणले बाहेर

0
jalgaon (3)

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बालरोग व चिकित्साशास्त्र विभागात मृत्यूशी झुंज देणाऱ्या एक वर्षाच्या बालकाला वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. याबद्दल अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विभागाचे कौतुक करून बालकाला रुग्णालयातून सुटी दिली आहे.

बोदवड तालुक्यातील जुनोने येथील एक वर्षीय बालक हे ताप, सर्दी, खोकला व श्वास घेण्यास १७ एप्रिल रोजी त्रास होऊ लागला होता. तसेच तो कोरोनाबाधित देखील होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करताना त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झालेली होती. त्याच्या प्रयोगशाळेतील तपासण्या, एक्स रे याद्वारे त्याच्या आजारावर नियंत्रण  ठेवण्यासाठी बालरोग व चिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी प्रयत्न केले.

तब्बल १२ दिवसांनी प्रकृतीत सुधारणा जाणवून आल्यावर वैद्यकीय पथकाला यश आले. सलग १८ दिवस ऑक्सिजन व त्यानंतर औषधोपचार करून त्याची मृत्यूची झुंज थांबवून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यास २३ दिवसांनी बालरोग विभागाला यश आले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुरोशे यांच्यासह डॉ. गिरीश राणे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. नीलांजना गोयल, डॉ. विश्वा भक्ता, वॉर्ड इन्चार्ज संगीता शिंदे व नर्सिंग स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

शुक्रवारी ७ मे रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे यांच्या उपस्थितीत बालकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी बालरोग विभागाचे प्रमुख डॉ.सुरोशे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. नीलांजना गोयल, डॉ. विश्वा भक्ता, अधिसेविका कविता नेतकर आदी उपस्थित होते.

दोन महिन्यात ३८ बालकांवर उपचार  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागात मार्च ते मे या दोन महिन्यात तब्बल ३८ कोरोना पॉझिटिव्ह बालकांवर उपचार झाले आहे. त्यात गंभीर १४ तर २४ इतर बालकांवर उपचार झाले. यात ३० बालकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत ६ कोरोनाबाधित रुग्ण दाखल असून त्यात २ गंभीर आहे. बालकांना कोरोनाची कुठलीही लक्षणे जाणवली तर उशीर न करता तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.

सावधान ! उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळले

0
jalgaon (2)

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड कहर निर्माण केलेला असतानाच आता कोरोना बाधितांमध्ये म्युकर मायकोसिसचा संसर्ग पाहायला मिळत आहे.  कोरोनाशी लढताना रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे घरी परतणाऱ्या अनेक रुग्णांना आता म्युकोरमायकोसिसची लागण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. म्युकोरमायकोसिसचा हा आजार इतका गंभीर आहे की, रुग्णाच्या जगण्याची शक्यता केवळ 50 टक्के इतकी असते. तसेच यामुळे अंधत्त्व आणि इतर गंभीर व्याधी उद्धवू शकतात.

सध्या उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचे अनेक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे म्युकोरमायकोसिसचा वाढता संसर्ग राज्यासाठी नव्या संकटाची चाहुल मानली जात आहे.

दरम्यान, रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता म्युकोरमायकोसिस साथीच्या आजाराप्रमाणेही फैलावू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आतापासूनच दोन्ही जिल्ह्यांमध्ये म्युकोरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही औषधेही प्रचंड महाग आहेत.

सध्याच्या घडीला मुंबईच्या परळ येथे म्युकोरमायकोसिसवर उपचार होणारे एकमेव स्पेशालिटी रुग्णालय आहे. या रुग्णालयात म्युकोरमायकोसिसच्या 31 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यापैकी 25 जण हे मुंबईबाहेरील आहेत. याचा अर्थ राज्यात म्युकोरमायकोसिसचा संसर्ग वेगाने वाढत आहे.

म्युकोरमायकोसिसच्या संसर्गाला साधारण नाकापासून सुरुवात होते. त्यानंतर हा संसर्ग तोंडाचा जबडा आणि मेंदूपर्यंत पसरत जातो. हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर डॉक्टरांच्या हातात उपचार करण्यासारखे फार काही उरत नाही, असे डॉ. हेतल मारफातिया यांनी म्हटले.

 

सोन्याच्या भावात मोठी वाढ ; जाणून घ्या जळगावातील आजचे भाव

0
gold rate 2

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ । सोन्याच्या भावात आज पुन्हा वाढ झाली आहे. जळगावमधील सुवर्णनगरीत आज शनिवारी सोन्याच्या भावात प्रति १० ग्रम ५२० रुपयाने वाढ झाली आहे. तर आज चांदीचा भाव स्थिर आहे.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ५२ रुपयांनी वाढून ४,७९१ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,९१० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५६३ रुपये इतका आहे. त्यात प्रति ग्रम ५० रुपयांची वाढ झाली असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,६३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

तर आज चांदीच्या भाव स्थिर आहे. १ ग्राम चांदीचा भाव आज ७४.२ रुपये इतका असून १ किलोचा दर ७४.२०० रुपये इतका आहे.

दरम्यान, कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यात सोन्याच्या दर ५० हजारार्यंत जाऊ शकतात.

सावदा येथे कोव्हेक्सीनच्या दुसऱ्या डोसची नागरिकांना प्रतीक्षा

0
vaccination on corona is effective

सावदा येथे मार्च पासून लसीकरण सुरू झालें असून येथे प्रथम जवळपास 20 दिवस व त्या पेक्षा जास्त दिवस नागरिकांना कोव्हेक्सीन ही लस देण्यात आली आता याच नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध होत नसल्याने त्यांना सदर दुसरा डोस त्वरीत उपलब्ध करून देण्याची मागणी सावदा शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी यांनी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे व जिल्हावैद्यकीय अधिकारी श्री चव्हाण यांचे कडे केली असून त्यांनी येत्या 2 ते 3 दिवसात ही लस येथे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे,

सावदा येथे प्रथम “कोव्हेक्सीन” घेणाऱ्या नागरिकांना प्रथम डोस घेऊन जवळपास 40 दिवस उलटून गेले असून त्यांना आता कोव्हेक्सीन चा दुसरा डोस घेणे अनिवार्य झाले असताना सदर लस येथे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची चांगलीच वणवण होत असून अनेक दुसऱ्या ठिकाणी किंवा खाजगी रुग्णालयात देखील ती उपलब्ध होत नसल्याने आता या नागरिकांना चिंता लागली असून जर दुसरा डोस वेळेत मिळाला नाही तर आता पुढे काय करावे ही देखील चिंता लागून आहे, येथील ग्रामीण रुग्णालयात तपास केला असता वरून जी लस येईल ती आपण देतो आम्हाला कोणती लस हवी ती मागणी करता येत नाही असे समजले त्या मुळे आता कोव्हेक्सीन च्या दुसऱ्या डोस साठी नागरिकांना आता मात्र पर्याय सापडत नसल्याचे चित्र सध्या शहरात आहे,

कोव्हेक्सीन च्या दुसरा डोस मिळेल। या आशेने दररोज नागरिक सकाळ पासून येथील लसीकरण केंद्रावर गर्दी करतात मात्र सदर लस उपलब्ध नसल्याचे समजताच त्यांना परत माघारी फिरावे लागते हा प्रकार सुमारे 8 ते 10 दिवसा पासून सुरू आहे. याच सर्व प्रश्ना बाबत अनेक नागरिकांनी शिवसेना पदाधिकारी यांचे कडे तक्रार केल्यावर लागलीच सावदा शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी यांनी तात्काळ जिल्हावैद्यकीय अधिकारी श्री चव्हाण व रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना याबाबत फोन वरून संपर्क साधला व सदर नागरिकांची कैफियत मांडली व त्वरित येथे कोव्हेक्सीन ही लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली यावेळी जिल्हावैद्यकीय अधिकारी व तहसीलदार यांनी देखील सदर बाब लक्षात घेऊन सावदा येथे येत्या 2 ते 3 दिवसात आपण सदर कोव्हेक्सीन लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून हा दुसरा डोस उपलब्ध झाल्यास सदर नागरिकांचे व्हेकसिनेशन देखील पूर्ण होणार आहे.

अँटीजन टेस्ट केल्याशिवाय लसीकरण करू नये ; महापौर महाजनांच्या सूचना

0
jalgaon (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । जळगाव शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रच कोरोना हॉटस्पॉट ठरू पाहत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांची अँटीजन टेस्ट केल्याशिवाय त्यांना लस देण्यात येऊ नये अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या.

जळगाव शहरातील लसीकरण केंद्राचे नियोजन करण्यासाठी आणि नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मनपा नगरसेवक ऍड.दिलीप पोकळे, चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे, गजानन पाटील, मनपा वैद्यकीय अधिकारी राम रावलानी, डॉ.शिरीष ठुसे आदी उपस्थित होते.

लसींचा पुरवठा कमी होत असल्याने आपण योग्य रीतीने नियोजन करावे,  नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पाणी आणि ग्रीननेटची व्यवस्था करावी, रांग लावून टोकन सिस्टीमचा वापर करावा अशा सूचना महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केल्या.

जळगावात १८ ते ४५ आणि ४५ वरील नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी वाढत आहे. शासनाकडून लस पुरवठा नियमीत होत असेल तर नवीन केंद्र सोमवारपासून सुरू करण्यात यावे. जेणेकरून नागरिकांची सोय होईल असे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले.

१८ ते ४५ वयोगट आणि ४५ वयोगटावरील नागरिकांची वेगवेगळी व्यवस्था करण्यात यावी. वेगवेगळे केंद्र निश्चित केल्यास नागरिकांची गर्दी होणार नाही अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

शाहू महाराज हॉस्पिटल येथील लसीकरण केंद्रास महापौर-उपमहापौरांची भेट

0
jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज शाहू महाराज हॉस्पिटल येथील लसीकरण केंद्रास भेट दिली. लसीकरणासाठी या केंद्रावर नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आल्यानंतर महापौर व उपमहापौर यांनी येथे जाऊन  पाहणी केली व नागरिकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले.

यावेळी महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, नागरिकांनी लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन ला प्राधान्य द्यावे. जेणेकरून लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार नाही व सर्व लसीकरण हे सुरळीतपणे सुरू राहील. इतर ठिकाणांपेक्षा लसीकरण केंद्रावरच जास्त गर्दी आढळून येत असल्याने कोरोना चा धोका वाढायला नको, त्यामुळे आपण सर्वांनी संयमाने प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील हेदेखील उपस्थित होते. ते म्हणाले की ,सध्या लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणास विलंब होत असून नागरिकांना गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. परंतु ज्याप्रमाणे लस प्राप्त होत आहे, त्याप्रमाणे सर्व नागरिकांना लस दिल्या जात आहे. त्याबरोबरच ज्या नागरिकांनी कोविशिल्ड या लसीचा प्रथम डोस घेतला असेल , त्यांनी कोवीशील्ड लसीचाच दुसरा डोस घ्यावा आणि ज्यांनी कोव्हॅक्सिचा पहिला डोस घेतला असेल त्यांनी कोव्हॅक्सीन चाच  दुसरा डोस घ्यावा. प्रथम डोस वेगळ्या लसीचा  व दुसरा डोस वेगळ्या लसीचा घेऊ नये. तसेच लस घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ला प्राधान्य देऊन लसीकरण केंद्रांवर गर्दी टाळण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

…म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जमावबंदीचे आदेश असतांना धरणगाव तहसीलदारांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या माधूरी अत्तरदे यांच्यासह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

सावळा- बांभोरी गटातून जिल्‍हा परिषद सदस्‍या म्‍हणून निवडून आलेल्‍या माधुरी अत्‍तरदे यांच्यासह बांभोरीचे माजी सरपंच राकेश नन्नवरे, कविता नन्नवरे, वर्षा झोपे, नयना चौधरी, सुनिता बोरोले यांनी धरणगावात असलेल्‍या समस्‍या घेवून नागरीकांना न्याय देण्यासाठी विविध मागण्यांसाठी तहसीलदार नितीन देवरे यांच्याविरोधात गुरूवारी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जमावबंदीचे आदेश असतांना तसेच साथरोग प्रतिबंध कायदा लागून असतांना देखील बेकायदेशीररित्या ७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत नियमांचे उल्लंघन केले.

याप्रकरणी जि.प. सदस्या माधूरी अत्तरदे यांच्यासह सहा जणांविरुद्ध कोरोनाचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोलीस विकास पहूरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र सुरवाडे करीत आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी : ०७ मे २०२१

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी दिवसेंदिवस कमी होत असतानाच आज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. आज ८६१ नवे बाधित रुग्ण आढळून आले तर ८०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

जळगाव जिल्ह्यात मे महिन्याची सुरवात कोरोना संसर्गाच्या बाबतीत सुखावह झाली आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, आज बाधित रुग्ण अधिक आढळून आले आहे. आज ८०८ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे.  जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित झालेल्या १ लाख २८ हजार १७२ रुग्णांपैकी १ लाख १६ हजार २७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र जिल्ह्यात मृत्यू सत्र सुरूच आहे. आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २३०४ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या ९५९४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९०.७२ टक्क्यांवर पोहचले आहे.

जळगाव शहर १२७, जळगाव ग्रामीण ३२, भुसावळ १०६, अमळनेर ३६, चोपडा ४७, पाचोरा २८, भडगाव ०७, धरणगाव १५, यावल २४, एरंडोल २४, जामनेर १०५, रावेर ७०, पारोळा ३५, चाळीसगाव ६७, मुक्ताईनगर ८१, बोदवड ३६, अन्य जिल्ह्यातील २१.

कोरोना नियमांचे उल्लंघन ; जळगावात १८ दुकानांवर सीलची कारवाई

0
jalgaon (2)

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतांना जळगाव शहरात शटर बंद करून व्यवसाय करणाऱ्या १८ दुकानांना सील लावण्याची कारवाई आज शुक्रवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आला आहे. याकालावधीत अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. असे असतांनाही व्यावसायिक ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊन, आणि शटर बंद करून आत मध्ये व्यवसाय करत असून नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहेत. यात काही दुकानदार ग्राहकांची गर्दी जमवून व्यवसाय करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. अशाच प्रकारे दुकानाचे शटर बंद करून व्यवसाय करणारे जवळपास १८ दुकानांना सील करण्यात आलेत.

बळीराम पेठेतील पुष्पा कलेक्शनमध्ये महिलांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचा प्रकार मनपा पथकासमोर उघड झाला.  आज नॅशनल प्लास्टिक स्टोअर्स, राजस्थान वेल्डिंग वर्क्स (कोंबडी बाजार चौक),  न्यू बी. जे. मार्केटमधील श्री राज आटो, सॅनोरीटा  इलेक्ट्रिकल्स, महाराष्ट्र पेंट हाऊस, वेद प्रिंट्स ऑफसेट, शाह इंजिनीअरिंग वर्क्स, सुनील अर्जुन पाटील हे दुकाने सील करण्यात आली. बोहरा गल्लीत अनंत हेअर आर्ट्स, आकाश शूज सेंटर (दौलत प्लाझा, टावर चौक),  पुष्पा कलेक्शन (बळीराम पेठ), महात्मा फुले मार्केट मधील जगदीश होजीअरी, मेट्रो ड्रेसेस, राधिका ड्रेसेस, विशाल युनिफॉर्म व शाहू नगर हौसिंग सोसायटी मधील दीपक प्लाय अॅन्ड  किचन व निसरा प्रहार प्रेसला सील लावण्यात आले.