⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024

जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : ११ मे २०२१

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ ।  आज मंगळवारी जळगाव जिल्ह्यात ८४३ नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ७४० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात भुसावळ, अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील कोरोना संसर्ग वाढलेला आहे.

जळगाव शहरात सलग दुसर्या दिवशी नवे रुग्ण शंभराच्या आत आढळून आले. आज मंगळवारी प्राप्त अहवालात शहरात केवळ ६९ रुग्ण आढळून आले असून ९९ रुग्ण बरे झाले.  मात्र, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये आता कोरोनाची संसर्ग वाढत आहे. आज मंगळवारी ८ हजार ०६१  चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून ८४३ नवे रुग्ण समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख ३१ हजार ५७४ इतकी झाली आहे. तर ७४० रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख १९ हजार ३०८ इतका झाला आहे.

आज १४ जणांचा मृत्यू झाला असून मृताचा एकूण आकडा २ हजार ३६३ वर गेला आहे. सध्या जिल्ह्यात ९९०३ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर- ६९, जळगाव ग्रामीण- २५, भुसावळ- ८९, अमळनेर- ९४, चोपडा- १०७, पाचोरा- ७९, भडगाव- ०३, धरणगाव-२६, यावल- २०, एरंडोल- २८, जामनेर- ६४, रावेर- ५१, पारोळा-१४, चाळीसगाव- ६२, मुक्ताईनगर-६३, बोदवड- ४२, अन्य जिल्ह्यातील- ०७.

एमआयडीसी पोलीसांनी आवळल्या दुचाकी चोरी करणाऱ्या दोन जणांच्या मुसक्या

0
jalgaon (4)

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । जळगाव शहरासह जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन जणांच्या एमआयडीसी पोलीसांनी आज मंगळवारी दुपारी मुसक्या आवळल्या आहे. यावेळी दोघांकडून चोरीच्या चार दुचाक्या हस्तगत करण्यात आले असून दोघांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, यातील मुख्य संशयित आरोपी फरार आहे.

गेल्या मागील काही दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरींच्या घटना मोठ्या प्रमाणत वाढल्या आहे. यासंदर्भात शहरातील पाचही पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या रेकार्डवरील अट्टल गुन्हेगार मुकुंदा देवीदास सुरवडे रा. मेहरूण ता.जि.जळगाव हा दुचाकींची चोरी करून तालुक्यातील चिंचोली गावातील गोपाल राजेंद्र पाटील आणि विशाल मधुकर इखे यांच्या मार्फत गावातील लोकांना विक्री केली असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पथक तालुक्यातील चिंचोली गावात जावून गोपाल पाटील आणि विशाल इखे या दोन्ही संशयित आरोपींना आज मंगळवारी सापळा रचून अटक केली. त्यांनी चिंचोली गावात विक्री केलेल्या चार दुचाकी पोलीसांनी हस्तगत केल्या आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस उपनिरीक्ष रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गफार तडवी, पोना. मिलींद सोनवणे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, सचिन पाटील, हेमंत कळसकर, सिध्देश्वर डापकर, चंद्रकांत पाटील, शांताराम पाटील यांनी केली. दोन्ही संशयित आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य संशयित आरोपी मुकुंदा सुरवाडे हा फरार आहे.

ट्रॅक्टर मोटरसायकलच्या भीषण अपघातात दोन युवक ठार

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । सावदा येथून जवळ असलेल्या सावखेडा येथे दि. ९ मे रोजी रात्री गौरखेडा – कुंभारखेडा फाटा या रस्त्यावर सुसाट वेगाने वाहतूक करणारे ट्रॅक्टर व मोटरसायकल यांची धडक होऊन मोटारसायकलस्वार दोन इसम ठार झाल्याची घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की मोटार सायकल स्वाराचा एक हात तुटून आठ ते दहा फुटापर्यंत तुटलेला हात फेकला गेलेला होता. याबाबत सावदा पोलिस स्टेशनला ट्रॅक्टर चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रानुसार सविस्तर वृत्त असे की, कुंभारखेडा फाट्यावरून राजू रमजान तडवी हे लोहारा गावाकडे मोटारसायकल वरून जात असताना गौरखेडा येथील युनूस समशेर तडवी यांने हात देऊन गाडी थांबवली व तोही त्या गाडीवर डबल सीट बसून ते गौरखेडा लोहारा रस्त्याने मोटारसायकल ने जाऊ लागले, थोड्या अंतरावर गेल्यानंतर समोरून सुसाट वेगाने येणाऱ्या स्वराज कंपनीच्या विना नंबर  ट्रॅक्टर ने मोटर सायकल ला जोरदार धडक दिली.

मयत राजू तडवी यांच्या मालकीची हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटर सायकल नंबर नसलेल्या गाडीचा अपघातात चूराळा झाला. आणि हा भीषण अपघात झाला. धडक एवढी जोरदार होती की मोटर सायकल स्वार लोहारा येथील राजू तडवी यांचा एक हात शरीरापासून वेगळा होऊन ८ ते १० फूट अंतरावर फेकला गेला. व दुसरा मोटर सायकल स्वाराच्या मागे बसलेला गौरखेडा येथील युनूस समशेर तडवी वय ३४ वर्ष हे पण आठ ते दहा फूट अंतरावर फेकले गेले.

लगेचच त्यांना फैजपूर येथील डॉक्टर खाचणे यांच्याकडे पुढील उपचाराकरता नेण्यात  आले. व तेथून पुढील उपचाराकरता भुसावळ येथे नेत असताना वाटेतच युनुस तडवी यांचा मृत्यू झाला व काही वेळाने राजू तडवी यांचा पण मृत्यू झाला. ही बातमी गावात पसरताच गौरखेडा व लोहारा गावावर शोककळा पसरली. अपघात घडताच ट्रॅक्टर चालक विजय प्रेम सिंग राठोड रा.लोहारा  ता. रावेर यांनी स्वतः पोलीस स्टेशनला येऊन घटनेची माहिती दिली व स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले व ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले.येन रमजान महिन्यामध्ये तडवी समाजाच्या या दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या  कुटुंबियांवर व गावावर एक मोठा आघात  झाला आहे.हे दोघे तरुण घरातील कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे.

सावदा पोलिस स्टेशनला  मूशीर रमजान तडवी रा. लोहारा ता रावेर यांच्या फिर्यादीवरून गुरन- ५६/२०२१ भादवी क.३०४( अ),२७९,३३७,३३८मो.व्हे.का. क.१८४,१३४ (अ)(ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. अपघातातील लोहारा ता रावेर येथील मयत राजू रमजान तडवी (वय ४९ )हे घरातील एकटेच कमावते  पुरुष असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर एक प्रकारे आघातच झालेला असून ते लोहारा येथील प्रगतशील शेतकरी तसेच आदिवासी विकास सोसायटीचे माजी चेअरमन होते.त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

अपघातातील दुसरे मयत युनुस समशेर तडवी (वय ३४) हे पण घरातील कमावते व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात बसला आहे. ते गौरखेडा येथील माजी सरपंच समशेर तडवी, यांचे  मोठे सुपुत्र असून त्यांच्या पश्चात तीन भाऊ, एक बहीण ,आई-वडील असा परिवार आहे.

परिसरात सदर भीषण अपघाताची बातमी लगेच पसरली.भीषण अपघाताची माहिती सावदा पोलिस स्टेशन चे सपोनि देविदास इंगोले यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.सदर मयताचे पोस्टमार्टम  करण्यासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात तात्काळ पाठवून ते मृतदेह सदर मयताच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी देण्यात आले,

पुढिल तपास सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डीडी इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार , पोलीस कॉन्स्टेबल युसुफ तडवी, मेहरबान तडवी, व सहकारी करीत आहे.

आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या रुग्णवाहीकेसाठी सावदा पो.स्टे.तर्फे 13 हजारांची मदत

0
savda

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । आदिवासी बांधवासाठी सुरु करण्यात आलेल्या समाज सेवी उपक्रम आदिवासी बांधवासाठी एक रुग्णवाहिका सुरु करण्यात आली. समाजातील काही लोकांनी लोकसहभागातुन ही रुग्णवाहिका घेऊन ती सुरु केली असून ही ऑक्सिजनयुक्त असून ही गत दोन वर्षापासून सुरु आहे. समाजतील लोकासाठी अत्यल्प भाड़े घेऊन ही सेवा त्यांना देण्यात येते याच रुग्णवाहीकेसाठी आज सावदा पोलीस स्टेशन तर्फे त्यांना 13 हजार रूपयांची मदत करण्यात आली.

यावेळी सावदा पोलीस स्टेशनचे स.पो.नी, देवीदास इंगोले यांनी 5 हजार, उपनिरीक्षक राजेंद्र पवार 3000 हजार रु, कॉ सुरेश आढाइगे यांनी 2500 रु, तसेच कॉ यूसुफ आमीर तडवी, रुस्तम सिकंदर तडवी, ममता रहेमान तडवी, सलीम दिलदारखा तडवी, बशीर तडवी या सर्वानी प्रत्येकी 1 हजार रुपये अशी मदत मिळून एकूण 13 हजार रुपये दिले त्यांचे हे योगदान आदिवासी तडवी समाज बंधवा साठी मोलाचे ठरणार असून यापुढे देखील या समाजसेवी कार्यासाठी मदत करू असे देखील यावेळी स,पो,नी, देवीदास इंगोले यांनी सांगितले

कोरोनावर केली मात; मुलांनी चक्क हार घालून केले आईचे स्वागत

0
jalgaon (2)

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील ६० वर्षीय महिलेला कोरोनाबाधित झाल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होत होता. चिंताजनक अवस्थेत त्यांना दाखल केल्यावर पुढील १० दिवस औषधोपचार झाल्यानंतर त्या पूर्ण बऱ्या झाल्या. सोमवारी १० मे रोजी त्यांच्या मुलांनी डिस्चार्ज घेताना चक्क हार घालूनच आईचे स्वागत करीत घरी नेले. हि सुखावह घटना घडली, जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात.

नगरदेवळा येथील शेतकरी कुटुंबातील पाटील परिवारातील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ताप येणे, अशक्तपणा अशी लक्षणे जाणवायला लागली. तसेच, ऑक्सिजन घेण्यास त्रास व्हायला लागला. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावात ३० एप्रिल रोजी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांचा ऑक्सिजन ७० ते ७२ दाखवीत होता. त्यांचा एचआरसिटी स्कोअर हा २० होता. त्यांना त्वरित ऑक्सिजन मास्क लावून औषधोपचार सुरु करण्यात आले.

अखेर १० व्या दिवशी वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर मात करून या महिला पूर्ण बऱ्या झाल्या. सोमवारी त्यांना वॉर्ड क्रमांक ९ मधून डिस्चार्ज देण्यात आला. रविवारी ९ रोजीच ‘मदर डे’ साजरा झाला. त्याच्याच दुसऱ्या दिवशी महिलेच्या मुलांनी आईसाठी फुलांचा हार आणून गळ्यात टाकीत स्वागत करीत घरी नेले. यावेळी डॉ. संजय धुमाळे, वॉर्ड इन्चार्ज अधिपरिचारिका शैला शिंदे, अधिपरिचारिका नसरीन शेख उपस्थित होते. येताना स्ट्रेचरवर अत्यवस्थ स्थितीत आलेली आई जाताना स्वतःच्या पायाने चालत घरी गेली म्हणून मुलांनी वैद्यकीय यंत्रणेचे आभार मानले. ६० वर्षांची आमची आई घरी परत येईल अशी आम्हाला खात्री वाटत नव्हती. तुम्ही आमच्यासाठी देव आहात, अशी प्रतिक्रिया मुलांनी डॉक्टरांकडे व्यक्त केली.

“कोरोनाबाधित झाल्यावर रुग्ण अत्यवस्थ होत असेल आणि त्याला वेळेत उपचाराकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले तर नक्कीच तो  बरा होऊ शकतो. कुठलीही भीती न बाळगता, निःसंकोच रुग्णालयात रुग्णांनी दाखल व्हावे.”

– डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव.

बाल विवाह रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

0
abhijit raut

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । कोवीड-19 च्या काळात समाजात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनत आहेत. कोरोना कालावधीत इतर समस्यांसोबत भेडसावणारी महत्वपूर्ण समस्या बालविवाह असून सततचे लॉकडाऊन, बंद व बेरोजगारी यामुळे बाल विवाहाचे प्रमाण वाढत आहे.

भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्वाची आणि सार्वत्रिक सामजिक क्रिया आहे. सहाजिकच शुभमुहूर्तावर विवाह विधी केल्या जातात. अक्षयतृतीया हा महत्वाचा मुहूर्त असल्याने या शुभ मुहुर्तावर सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बाल विवाहाचे प्रमाण मोठया प्रमाणात असण्याची शक्यता नाकरण्यात येत नाही. त्यामुळे अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर होणारे बाल विवाह रोखण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले आहे.

बाल विवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार असे विवाह बेकायदा ठरतात. या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे. या कायद्याच्या अमंलबजावणीसंदर्भात ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे बाल विवाह आणि बाल हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे. असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

बाल विवाह हेाऊ नये यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना होणे आवश्यक आहे. असे विवाह होत असल्याचे लक्षात आल्यास त्यावर तातडीने संबंधित यंत्रेणेने आवश्यक कायदेशीर कार्यवाही करावी.  अक्षय तृतीयेच्या महुर्तावर जिल्ह्यात बाल विवाह होणार नाहीत याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीने घेणे गरजेचे आहे व कोठेही बाल विवाह होत असल्यास ग्रामीण भागासाठी संबंधित ग्रामसेवक आणि शहरी  भागासाठी सबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी हे बाल विवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. तसेच जिल्हास्तरावर बाल कल्याण समिती, जिल महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, पोलीस विभाग, चाईल्ड लाईन (1098) , पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका तसेच प्रत्येक महसुली गावातील गाव बाल संरक्षण समिती यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहनही जिल्हाधिकरी श्री. राऊत यांनी केले आहे.

ईदच्या खरेदीसाठी दुकाने उघडण्याची परवानगी द्या ; जिल्हाधिकाऱ्यांना मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे साकडे

0
jalgaon (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । रमजान पर्व अंतिम चरणात असून गुरुवारी किंवा शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यावर रमजान ईद साजरी होईल परंतु कडक निर्बंध असल्या कारणामुळे मुस्लिम धर्मीयांची ईद मागील दोन वर्षापासून साजरी होत नसल्याने आज जळगाव जिल्हा मुस्लिम इदगाह व कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक व जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची दुपारी दोन वाजता भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

कपडा-ड्राय फ्रुट-फळ- धान्य- फेरीवाले यांना विशेष सूट द्या

११ ते १४ या तीन दिवसासाठी बाजाराच्या वेळेत विशेष सवलत देऊन त्यात प्रामुख्याने लहान मुलांचे रेडिमेट कपडे ,त्यांना लागणारी खेळणी व इतर साहित्य तसेच शीर-खुर्मा साठी लागणारे वेगवेगळे ड्रायफ्रुट्स, फितरा साठी धान्य व उपास सोडण्यासाठी आवश्यक ते फळे व भाजीपाला यांची दुकाने दुपारी दहा ते बारा किंवा संध्याकाळी चार ते सहा या वेळेत विशेष बाब म्हणून उघडण्याची परवानगी द्यावी  तसेच  जिल्हा दंडाधिकारी लातूर यांनी ज्याप्रमाणे आदेश पारित केले त्याच धर्तीवर शासनाच्या नियमावलीच्या अधीन राहून काही कडक नियम शितील करू परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

माननीय अभिजीत राऊत यांनी सदर प्रकरणी सकारात्मक धोरण अवलंबून काहीतरी प्रमाणात ढिल देता येईल का ते तपासून त्वरित  आदेश करतो असे आश्वासन दिले आहे.

 

सावदा येथील लसीकरण केंद्रास रोहिणी खडसे यांची भेट

0
savda vaccined center

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । सावदा येथील अं.ग.हायस्कुल मध्ये सुरू असलेल्या कोरोना लसीकरण केंद्राला जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी भेट दिली. यावेळी रोहिणीताई खडसे यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यासंबंधात जिल्हाधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांचे समवेत दूरध्वनी वरून  लसींचा पुरवठा वाढविण्या संदर्भात आणि लसीकरणासाठी आणखी एक खिडकी उघडण्यासंबंधी चर्चा केली जेणेकरून लसीकरणाचा वेग वाढेल.

यावेळी नगराध्यक्षा अनिता ताई येवले, उपनगराध्यक्ष विश्वास भाऊ चौधरी, अतुलभाऊ नेहते, मुरादजी तडवी, सय्यदजी असगर , पंकज भाऊ येवले,माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर पाटील, बंटी बढे सर  उपस्थित होते.

दरम्यान येथील लसीकरण केन्द्रावर आज कोव्हॅसीनचा दूसरा डोस उपलब्ध होणार असल्याने सकाळ पासून अनेक नागरिक येथे रंगा लाऊन उभे होते मात्र येथे फक्त 100 डोस आले असल्याने व जवळपास 2000 लोकांना येथे कोव्हॅसीन च्या  दुसऱ्या डोस ची अत्यावश्यक असल्याने येथे प्रचंड गोंधळ दिसून आला अनेकांना सकाळी कूपन मिळाले नाही त्यामुळे ते संतप्त झाले व येथे काही वेळ गोंधळ निर्माण झाला यातच अनेक वयोवृद्ध नागरिकांची मात्र चांगलीच हेळसांड होत होती. दरम्यान रोहिणीताई खडसे यानी येथे आवश्यक असलेल्या कोव्हॅसीन साठी आणखी प्रयत्न करू यासाठी जळगाव येथे जिल्हारुग्णालयाचे डॉक्टर तसेच जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधुन प्रयत्न करू असे सांगितले.

तसेच नागरिकांना येथे लस घेण्यासाठी आल्यावर बसन्याची तसेच उन्हा पासून बचाव व पिण्याचे पाणी यासारख्या सुविधा उप्लब्धते बाबत देखील पहानी केली तर अनेक नागरिकांनी रोहिणीताई यांचेशी संपर्क साधुन येथील अपूर्ण लस साठा, तसेच इतर समस्या व गोंधळा बाबत लक्ष वेधले यावेळी त्यांनी सर्वाच्या समस्या ऐकून त्या सोडऊ असे सांगितले तसेच सर्वाना लस मिळेल यासाठी प्रयत्न करीत आहो मात्र गोंधळ करू नका अशी देखील विनंती केली तसेच सोशल डिस्टनसिंग चे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन केले,

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे ; जिल्हाधिकारी राऊत

0
abhijit raut

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । आगामी मान्सुन कालावधीत जिल्ह्यात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवून परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी केले आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सून पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंह रावळ हे उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, महसुल विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, शोध व बचाव साहित्याची तपासणी करुन सर्व साहित्य सुस्थितीत ठेवावे, मान्सुनकाळात आपत्ती प्रवणक्षेत्रात पुरेसा धान्यसाठा व वितरण करण्याचे नियोजन करावे. अंत्योदय योजनेतंर्गत लाभार्थ्यांना मान्सुन काळात धान्य पुरवठ्याचे नियोजन करावे. आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांबाबत पुरेसा औषधसाठा करुन ठेवावा. आवश्यक औषधसाठ्याची मागणी नोंदवावी, जलजन्य व किटकजन्य आजार होवू नयेत याबाबत दक्षता घ्यावी. पाटबंधारे विभागाने धरणनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन पुररेषा निश्चित करावी. धरणातून विसर्ग सुरु करणार असल्यास त्याबाबतची माहिती दवंडी, सायरण यंत्रणेद्वारे द्यावी, हवामान खात्याकडून येणारे संदेश शेतकऱ्यांना वेळेत पोहोचविण्याचे काम कृषि विभागाने करावे. बांधकाम विभागाने रस्त्यांवरील पुल, पडणारी झाडे तसेच पाझरतलाव यांची पाहणी करुन घ्यावी तर नगरपालिकांनी आपल्याकडील अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी, वीज वितरण कंपनीने लोंबकळणाऱ्या तारा, उघडे ट्रान्सफार्मर, धोकेदायक पोल यांची दुरुस्ती करावी. आपत्तीच्या काळात कोणीही पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाही याची सर्व संबधित विभागांनी दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वाना दिलेत.