⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024

रासायनिक खतांच्या किमती पूर्ववत करण्याची खा.उन्मेश पाटलांची केंद्राकडे मागणी

0
unmesh patil

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ ।  सद्यस्थितीत रासायनिक खतांच्या किमती बाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नसताना दुसरीकडे रासायनिक खतांची किमती वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या अनुषंगाने खासदार उन्मेश दादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रासायनिक खतांच्या किंमती पूर्ववत ठेवाव्यात. तसेच खतांवर दिली जाणारी सबसिडी वाढवून द्यावी आग्रही मागणी केली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या अनुषंगाने खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केंद्रीय रासायनिक खते मंत्री सदानंद गौडा, रासायनिक खते राज्यमंत्री मनसुख मांडविय तसेच केंद्रीय सचिव योगेंद्र त्रिपाठी यांच्याकडे पत्राद्वारे रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक शोषण होणार असून शेतमालाच्या किमती त्याच असताना, दुसरीकडे रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

गेल्या वर्षी लॉकडाउन मुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने, खत निर्मिती खर्चात वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढल्याने खतांच्या किमती वाढल्याचे प्रथम दर्शनी दिसत असले तरी आपला देश कृषीप्रधान देश असल्याने बळीराजा जगला पाहिजे त्याला सर्वतोपरी मदत केंद्राकडून झाली पाहिजे या भावनेने रासायनिक खतांच्या झालेल्या दरवाढीबाबत केंद्राने फेरविचार करावा व रासायनिक खतांच्या किमती पूर्ववत ठेवाव्यात. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

शेतकरी बांधवांनी काळजी करु नये

येत्या आठवड्याभरात खतांच्या किमती कमी होतील अशा हालचाली केंद्राने वेगात सुरू केल्या असुन रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती येत्या आठवडाभरात निश्चितच कमी होतील. शेतकरी बांधवांनी काळजी करू नये, केंद्र सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

बळीराजास दिलासा देणार

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. सात्यत्याने मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी तसेच पक्षाच्या पदाधिकारी यांनी केंद्र सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी. म्हणून गेल्या काही दिवसापासून  संपर्क साधून नाराजीची भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रासायनिक खते मंत्री मा. सदानंदजी गौडा, तसेच  राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांना पत्राद्वारे तसेच केंद्रीय सचिव योगेंद्र त्रिपाठी यांना संपर्क साधून रासायनिक खतांच्या किंमती अचानक वाढल्याने शेतकरी वर्गात विशेषत: भाजपच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजी विषयी जाणीव करून दिली. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा खतांच्या दरवाढी बद्द्ल चिंता व्यक्त केली आहे, शेतकरी बांधवांना ही दरवाढ परवडणारी नसल्याने खतांच्या किंमतीपूर्वी प्रमाणेच असाव्यात यासाठी त्वरित एक मंत्रिगटाची नियुक्ती करून खतांच्या किमती कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे निश्चितच येत्या आठवड्यात  खतांच्या वाढलेल्या किमती कमी केल्या जातील आणि शेतकऱ्यांना वाजवी किमतीत रासायनिक खते मिळतील. खरीप हंगामाच्या आधी हा निर्णय घेतला जाणार आहे.

त्यामुळे देशभरातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये, येत्या आठवड्यापर्यंत खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्र सरकारकडे लावून धरली आहे.

विषारी द्रव्य प्राशन करून तरुणाची आत्महत्या ; जवखेडे बु. येथील घटना

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ ।  एरंडोल तालुक्यातील जवखेडे बु! येथे ३० वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली. सुनील रुपसिंग सोनवणे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्या केल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही.

सुनील सोनवणे यांनी आज सकाळी विषारी द्रव्य प्राशन केले. त्याला एरंडोल येथे कल्पना हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ नेण्यात आले असता तो मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.

याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल विकास देशमुख हे पुढील तपास करीत आहेत.

चोपड्यात साडेचार लाख रुपयांचा गुटखा जप्त ; तीन आरोपींना अटक

0
chopda

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ ।  चोपडा शहरात व तालुक्यात गुटखा माफियांची दिवसेंदिवस मुजोरी वाढतांना दिसून येत आहे. चोपड्यात दररोज सरासरी वीस लाख रुपयांचा गुटखा छुप्या मार्गाने येत असल्याचे बोलले जात आहे. गुटख्याची तष्करी वाढतांना दिसून येत आहे .त्या अनुषंगाने चोपडा शहर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले असून त्यात रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यात साडे चार लाख रुपयांचा गुटखा सोबत तीन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत असे की,  पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली दिनांक १७ व दिनांक १८ रोजी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांची टीम रात्री गस्त करीत असताना मिळालेल्या गुप्त  बातमीप्रमाणे चोपडा शहरातील पाटीलगढी भागात छापा टाकला असता रमाकांत बाबुराव मराठे यांच्या कब्जात एक्यानव  हजार पाचशे वीस रुपये किमतीच्या विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली.

त्याने दिलेल्या माहितीवरून मुख्य आरोपी राहुल विश्वास गुजराथी (गुजराथी गल्ली चोपडा) यास ताब्यात घेण्यात आले आहे . व दोन्ही आरोपींवर चोपडा शहर पोलीस स्टेशनला भाग पाच गुरन  १८८/ २०२१ भादवि कलम ३२८ , २७२ , २७३  प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे . अटके दरम्यान मुख्य आरोपी राहुल गुजराथी  याने दिलेल्या माहितीच्या आधारे मच्छी मार्केटमध्ये उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकप वाहन क्रमांक एम एच १९-५३८७ ताब्यात घेण्यात आली असता त्यात तब्बल एकवीस प्रकारच्या पानमसाला व सुगंधी तंबाखू असा एकूण तीन लाख अठ्ठावन  हजार एकशे पन्नास  रुपये किमतीच्या माल  व चार लाख रुपये किमतीची पिकअप वाहन  व चालक श्याम बडगुजर मिळून आला.

सदर आरोपी यास विचारपूस केली असता त्याने सदर माल  राहुल गुजराथी  याच्या असल्याबाबत सांगितले . नमूद गुन्ह्यातील  चार लाख एकोणपन्नास  हजार चारशे रुपये किमतीचा गुटखा व चार लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एमएच १९ –  ५३८७ असे एकूण आठ लाख एकोणपन्नास हजार चारशे  रुपये किमतीचा मुद्देमाल व तीन आरोपी यांना अटक करण्यात आली आहे . सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे , अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण,अंबादास सैंदाणे, विलेश सोनवणे, संतोष पारधी, प्रदीप राजपूत, ज्ञानेश्वर जवागे, शेषराव तोरे, वेलचंद पवार ,रत्नमाला शिरसाट, संदीप भोई, रवींद्र पाटील यांनी केली. सदर गुन्ह्याचा  पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने पो ना  शेषराव तोरे करीत आहेत.

पिंपळकोठा येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ ।  एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे २६ वर्षीय विवाहितेने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. रत्‍नाबाई सुभाष भिल (वय २६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या मागचे कारण अजून अस्पष्ट आहे.

रत्‍नाबाई भिल ती तिच्या पतीसह पिंपळकोठा बुद्रुक या तिच्या माहेरी राहत होती. तिचे मूळ गाव मेहु तालुका पारोळा हे आहे. दरम्यान, रत्नाबाई भिल या विवाहितेने  दि १८ मे रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली घराच्या लाकडी सरीला लटकलेल्या अवस्थेत या महिलेचे प्रेत आढळून आले. गावातील लोकांच्या मदतीने प्रेत खाली उतरवण्यात आले एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले त्या ठिकाणी सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

याबाबत समाधान सोनवणे यांनी खबर दिल्यावरून एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

निपाणे येथील ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ ।  एरंडोल तालुक्यातील निपाने येथील विनोद सुरेश पाटील यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले आहे की निपाणे ग्रामपंचायतच्या मालकीच्या समता भुवन मधील खोल्या व शेतीचा जाहीर लिलाव दि -28 / 04 / 2021 रोजी संपन्न झाला समोर ग्रामस्थ व लिलावात भाग घेणारे हजर होते.

निपाणे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक के डी मारे आप्पा ते सुधा हजर होते.परंतु निपाणे ग्रामपंचायतचे तीन सदस्य त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहेत.त्यांच्या गैर हजेरीत सरपंच व उपसरपंच यांच्या खुर्चीवर जाऊन बसले त्यांना तसा कुठला ही अधिकार नसतांना ग्रामपंचायतचा कारभारात मनमानी पद्धतीने व आकस बुद्धीने कारभार चालू आहे. त्यांनी लिलाव प्रक्रिये मध्ये गैर वर्तन केलेले आहेत.तरी मा.शासनाचे परिपत्रक 17 जुलै 2007 नुसार त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी ही विनती.गैर वर्तन करणारे सदस्य व त्यांचे पती यांचे नावे खालील प्रमाणे आहेत सदस्य 1. शालिनी शरद ठाकुर पति शरद पिरण ठाकुर 2. संगीता भिकन पाटील पति भिकन उत्तम पाटील 3. सुनीता हिम्मत पाटील पति हिम्मत मधुकर पाटील वरील तिन्ही सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात या नमूद करण्यात आले आहे. या निवेदनात अर्जदार ची हस्ताक्षर आहे.

तसेच निवेदन ची प्रत  जिल्हा परिषद,प्रांत अधिकारी, तहसीलदारांना, पंचायत समिती यांना देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्याला दिलासा ; आज ५२१ नवे बाधित रुग्ण, तर ६६५ कोरोनामुक्त

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू सुधारू लागली. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात नव्या बाधित रुग्णापेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक असल्याने जिल्ह्याला दिलासा देणारी बाब आहे.  आज मंगळवारी दिवसभरात ५२१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तसा ११ जणांचा बळी गेला आहे.

मे महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू सुधारू लागली. १४ एप्रिलपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा परिणाम आता दिसू लागला आहे. आज मंगळवारी प्राप्त अहवालानुसार गेल्या २४ तासांत नवे केवळ ५२१ रुग्ण समोर आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख ३६ हजार २८५ वर पोचली, तर ६६५ रुग्ण दिवसभरात बरे झाले असून, बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २४ हजार ३४६ वर पोचला आहे. दरम्यान,  गेल्या २४ तासांत ७ हजार ४७२ चाचन्याचे अहवाल प्राप्त प्राप्त झाले आहे.  तर गेल्या २४ तासांत११  बळींची नोंद झाली. त्यामुळे एकूण बळींची संख्या २ हजार ४३८ वर पोचली आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहरात ५१, जळगाव ग्रामीण १३, भुसावळ ५१, अमळनेर ०४, चोपडा ५४, पाचोरा ०३, भडगाव ०२, धरणगाव १४, यावल ३७, एरंडोल १९, जामनेर ७०, रावेर ५०, पारोळा १५, मुक्ताईनगर ४४, बोदवड १५, चाळीसगाव ७०,  अन्य जिल्ह्यातील ९.

आ.गिरीश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त सावदा येथे गोरगरिबांना फळ वाटप

0
sawda (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ । भाजपचे माजी मंत्री आ. गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सावदा येथे गोरगरीब परिवाराला फळ वाटप करण्यात आली.

याप्रसंगी  माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक राजेंद्र चौधरी, सागर चौधरी, विनोद नेमाडे, रितेश पाटील, नितीन भिरुड, कुंदन वाघूलदे,दिगा वाघूलदे, धीरज वाघूलदे, सर्वेश लोमटे, आशिष चौधरी,सागर पाटील, वैभव महाजन सुयोग भिरुड, विशाल तेली उपस्थित होते.

केंद्राने खतांची दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल

0
jalgaon (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ । केंद्रातील मोदी सरकारने खतांच्या किमती भरमसाठ वाढवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याच काम केल आहे या विरोधात जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी आवाज उठवत केंद्र सरकारच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व केंद्र सरकारने अन्यायकारक दरवाढ कमी न केल्यास जिल्हातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलनाचा इशारा दिला.

डीएपी, पोटॅश सह इत्यादी खतांच्या किमती साधारणता प्रति बॅग 700 ते 800 रुपयांनी वाढवल्या आहेत. पेट्रोल, डिझेल, गोडेतेल, डाळी सह इत्यादी सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारने पुन्हा अडचणी निर्माण केल्या आहेत. शेतकरी बांधवांचा येणारा खरीप हंगाम व्यवस्थित पार पडावा यासाठी अन्यायकारक अशी खतांचे दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने केली आहे.

इफको या कंपनीने आज आपल्या खताचे किमती जाहीर केल्या 1846 डीएपी या खताची किंमत 1900 रुपये प्रति 50 किलो बॅगची झाली आहे यापूर्वी या बॅगची किंमत तेराशे रुपये होती याच प्रमाणे 10 26 26 या खताची किंमत सतराशे 75 रुपये झाली असून यापूर्वी या खताची किंमत अकराशे 75 रुपये होते 15 15 15 या खताची किंमत पंधराशे रुपये प्रति पॅक झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत 1000 रुपये प्रति होती. 12 32 16 या खताची किंमत 1800 रुपये झाली असून यापूर्वी या खताची किंमत बाराशे पन्नास रुपये होती तर  या खताची किंमत 1350 रुपये झाली आहे यापूर्वी या खताची किंमत 950 रुपये होती तब्बल 500 ते 600 रुपये प्रमाणे खताच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे अजून इतर कंपन्यांनी आपले दर जाहीर केलेले नाहीत.

शेतकऱ्यांच्या मालकीचे असणाऱ्या इफको या कंपनीने आज आपल्या खताचे किमती जाहीर केल्या 1846 डीएपी या खताची किंमत 1900 रुपये प्रति 50 किलो बॅगची झाली आहे यापूर्वी या बॅगची किंमत तेराशे रुपये होती याच प्रमाणे 10 26 26 या खताची किंमत सतराशे 75 रुपये झाली असून यापूर्वी या खताची किंमत 1175 रुपये होते 15 15 15 या खताची किंमत पंधराशे रुपये प्रति पॅक झाली आहे . यापूर्वी या खताची किंमत 1000 रुपये प्रति होती 12 32 16 या खताची किंमत अठराशे रुपये प्रति वेळ झाली असून यापूर्वी या खताची किंमत बाराशे पन्नास रुपये होती तर वीस वीस झिरो या खताची किंमत तेराशे 50 रुपये झाली आहे यापूर्वी या खताची किंमत 950 रुपये होती तब्बल पाचशे ते सहाशे रुपये प्रमाणे खताच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे अजून इतर कंपन्यांनी आपले दर जाहीर केलेले नाहीत.

अवैध धंद्याविरोधात यावल तालुका मनसेचा आंदोलनाचा ईशारा

0
mns

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ । यावल तालुक्यातील अवैध धंदे पोलिसांनी तात्काळ बंद करा या मागणीसाठी सहभागासह आदोलन ईशारा दिला आहे. तालुक्यात सर्वत्र कोरोना विषाणुसंसर्गाच्या कहर सुरूच असल्याने या संकटाचा अनेक नागरिकांची म्रुत्यु ओढला जात आहे. असे असुन देखील यावल शहरात व तालुक्यातील सर्वत्र संचारबंदी नियम धाब्यावर टेवून सर्व काही अवैध धंदे मात्र जोराने सुरू असून ते अवैध धंदे बंद न झाल्यास नवनिर्माण सेनेच्या वतीने रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस स्टेशन समोर महिलांच्या उपस्थितीने विना पैशाचा पत्ता जुगार खेळणे आंदोलन करण्यात येणार असा ईशारा मनसेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक यांन पाठवलेले एका निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष चेतन आढळकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठवलेल्या तक्रारारी निवेदनात म्हटले आहे की कोरोना महामारीच्या या संकटकाळी ही यावल शहरात व तालुक्यातील सर्वत्र खुले आम सट्टा, मटका, जुगार, पत्त्याच्या अड्डे दारूची सरासरी विक्री केली जात आहे जुगार अड्यावर तसेच सट्टा मटका तथा खुले आम होत असलेल्या दारू विक्रीरामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमतांन दिसुन येत आहे.  या सर्व प्रकारचे जिल्हाधिकारी यांनी घातलेल्या संचारबंदी कडक निर्बंधचे पायमल्ली होतांना दिसून येत असल्याने चेतन आढळकर यांनी म्हटले आहे.

तात्काळ सर्व राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंदे पोलिसांनी तात्काळ बंद न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून यावल पोलिस स्टेशन समोर महिलांच्या उपस्थितीने विना पैशाचा जुगार पत्ते खोले आदोलन करण्यात येईल, आदोलन ठीकाणी उध्दभवना-या सुव्यवस्थेची परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल, असेही त्यांनी म्हटलं आहे.