⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | भाजपा व्यापारी आघाडी तालुका उपाध्यक्षपदी गजानन भार्गव तर शहराध्यक्षपदी जितेंद्र भारंबे

भाजपा व्यापारी आघाडी तालुका उपाध्यक्षपदी गजानन भार्गव तर शहराध्यक्षपदी जितेंद्र भारंबे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । भाजपा कार्यालय रावेर येथे भाजपा कोअर कमिटीची बैठक नुकतीच संपन्न झाली. यात भाजपा व्यापारी आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी गजानन भार्गव तर शहराध्यक्षपदी जितेंद्र भारंबे यांची नियुक्ती करण्यात आली. असे नियुक्ती पत्र जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, शिवाजीराव पाटील, ता.अध्यक्ष राजन लासुरकर यांच्या हस्ते देण्यात आले.

या निवडीनंतर जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आ.गिरीश महाजन, भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनताई पाटील, भाजपा किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रल्हाद पाटील यांनी फोनवरून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यालयात उपस्थित जिल्ह्या उपाध्यक्ष पद्माकरभाऊ महाजन, संगायोचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, तालुका अध्यक्ष राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, सि.एस. नवनिर्वाचित सावदा माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी शहर अध्यक्ष जे.के.भारंबे, माजी सावदा शहराध्यक्ष पराग पाटील, बेटी बचाव बेटी पढावच्या जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण, संतोष परदेशी, अतुल ओवे यासह कार्यकर्त्यांनी रावेर कार्यालय येथे त्यांचा सत्कार केला.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह