⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | भाजपची टीम प्रत्येक तालुक्यात कोरोना रुग्णांना करणार मदत

भाजपची टीम प्रत्येक तालुक्यात कोरोना रुग्णांना करणार मदत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२१ । भारतीय जनता पार्टी जळगांव जिल्हा ग्रामीणची दि.11 एप्रिल रोजी माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण व्हर्च्युअल बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काय उपाययोजना करता येईल, या संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हातील आमदार, खासदार व प्रमूख पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून भाजपा जळगांव जिल्हात प्रत्येक तालुक्यात भाजप कार्यर्त्याची एक टीम तयार केली जाणार आहे. ही टीम जिल्हातील कोरोना संदर्भात असलेल्या अडचणी (बेड,व्हॅटिलिटर, ऑक्सिजन, इंजेक्शन) संदर्भात काम करतील. त्याच बरोबर लसीकरणासाठी जनजागृती करणार आहे.व जनतेने टेस्ट करून घ्यावी असे आवाहन सुद्धा केले आहे.

दरम्यान, 14 एप्रिल महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी संपूर्ण जिल्हाभरात मेणबत्त्या व प्रत्येक कार्यकर्यांच्या घरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करणार आहे.

बैठकीला यांची होती उपस्थिती

जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजुमामा), खा.रक्षाताई खडसे, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, आ.संजयभाऊ सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, सरचिटणीस सचिन पानपाटील, मधुकर काटे, हर्षल पाटील, उपाध्यक्ष नंदू महाजन, अजय भोळे, राकेश पाटील, महेश पाटील, पद्माकार महाजन, के.बी. दादा, रेखाताई चौधरी, डी. एस.चव्हाण सर, शैलजा पाटील, चिटणीस राजेंद्र चौधरी, सविता भालेराव, रंजना नेवे , जिल्हातील सर्व जिल्हा पदाधिकारी व मंडल अध्यक्ष/ सरचिटणीस ,जिल्हा परिषद – पंचायत समिती सदस्य- सभापती  उपस्थिती होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.