जळगाव शहरमहाराष्ट्र

जळगाव शहर पोलीस ठाण्यात भाजपने दर्शवला निषेध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२२ । दूध संघात मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याची तक्रार भाजपआमदार मंगेश चव्हाण यांनी दिलीहोती. त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्याने भाजपच्या वतीने शुक्रवार १४ ऑक्टोबर रोजी शहर पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याच बरोबर पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याशी चर्चा करण्यात आली.

जळगाव जिल्हा दूध संघात लोणी आणि दूध पावडरमध्ये मोठा अपहार झाल्याची तक्रार आमदार मंगेश चव्हाण यांनी मंगळवार ११ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्याकडे केली होती. संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी देखील मागणी करण्यात आली होती. परंतु तक्रार देऊन तीन दिवस झाले अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. यासंदर्भात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांची भेट घेऊन निपक्षपणे या घटनेची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेविका सुचिता हाडा, नगरसेविका दीपमाला काळे, राधेश्याम चौधरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी चर्चेंअंत या घटनेत पारदर्शकपणे चौकशी केली जाईल, यात जो कुणी दोषी आढळून येईल, त्याच्यावर निश्चितपणे गुन्हे दाखल करण्यात येईल असे आश्वासन व ग्वाही यावेळी दिली.

Related Articles

Back to top button