---Advertisement---
चोपडा

चोपडा पंचायत समिती सभापतीपदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध

chopda
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । चोपडा येथील पंचायत समितिच्या सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा बापूराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.अलिखित करारानुसार चहार्डी येथील मालुबाई गोविंदा रायसिंग यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया दि १०  रोजी पार पडली.

chopda

यावेळी पिठासन अधिकारी म्हणून तहसीलदार अनिल गावित यांनी काम पाहिले.दुपारी ११ वाजता सभापती पदासाठी भाजपाच्या प्रतिभा बापूराव पाटील यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने पिठासन अधिकारी यांनी त्यांना बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

---Advertisement---

सभापती पदासाठी प्रतिभा पाटील यांना सूचक म्हणून कल्पना दिनेश पाटील ह्या होत्या.या निवड प्रक्रिया वेळी एकूण १२  सदस्यांपैकी ११ सदस्य उपस्थित होते. तर एकमेव सद्स्य तटस्थ राहिले यात सेनेचे माजी उपसभापती मच्छिंद्रनाथ वासुदेव पाटील (एम व्ही पाटील) हे अनुपस्थित होते. निवड प्रसंगी उपसभापती अमिनाबी रज्जाक तडवी,माजी सभापती आत्माराम म्हाळके,कल्पना यशवंतराव पाटील,मालुबाई रायसिंग,कल्पना दिनेश पाटील, सूर्यकांत खैरनार,भूषण मधुकर भिल्ल,रामसिंग पवार,भरत बाविस्कर, पल्लवी वना भिल्ल असे ११ सदस्य उपस्थित होते.निवड प्रक्रिया पार पाडणे कामी गटविकास अधिकारी बी एस.कोसोदे,नायब तहसीलदार राजेश पऊळ, आदींनी सहकार्य केले.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील,जि प सदस्य गजेंद्र सोनवणे, शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल, प्रदीप पाटील,बाजार समिती संचालक धनंजय पाटील,युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, यशवंतराव पाटील,हनुमंत महाजन,चंद्रकांत धनगर,विठ्ठल पाटील,भरत सोनगिरे, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---