रविवार, डिसेंबर 10, 2023

भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; राज्यातील ‘या’ तिघांवर महत्त्वाची जबाबदारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२३ । भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील तीन जणांवर महत्वाची जबाबदारी देण्यात आलीय.

यात विशेष म्हणजेच गेल्या अनेक काळापासून नाराज असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना देखील स्थान देण्यात आले असून त्यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच विनोद तावडे (Vinod Tavde), विजया राहटकर यांनाही स्थान देण्यात आलं आहे.

भाजपच्या नव्या कार्यकारणीमध्ये राष्ट्रीय संगठन महामंत्रिपदाची जबाबदारी बी. एल. संतोष यांच्याकडे सोपावण्यात आली आहे. तर राष्ट्रीय सह-संगठन महामंत्रिपदी शिवप्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामंत्रिपदी महाराष्ट्रातून विनोद तावडे यांना संधी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे आणि विजया राहटकर यांची राष्ट्रीय सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.