---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

फडणवीसांना धक्का ! मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराचा राजीनामा, कोण आहे वाचा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२३ । सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत होत चालला असून यात अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि नेते यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांनी पत्र लिहीत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर आता भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

fadanvis 1 jpg webp

त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलं आहे की, ”महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून या मराठा आरक्षणासाठी माझा पाठींबा असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.” असं त्यांनी म्हटलं आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---