भाजपच्या जळगाव पश्चिम विभागाची कार्यकारिणी जाहीर

ऑगस्ट 30, 2025 4:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून याच पार्श्वभूमीवर भाजपच्या पश्चिम विभागाची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांनी जाहीर केली. ९१ जणांच्या टीममध्ये २६ महिलांना संधी देण्यात आली. तर मराठा समाजाला झुकते माप देताना इतर समाजांच्या प्रतिनिधींना स्थान देण्याची खबरदारी घेण्यात आली आहे.

radhyesham chaudhari 1

मे महिन्यात डॉ. राधेशाम चौधरी यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर आठ तालुके अर्थात सहा विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित केली गेली आहे. डॉ. चौधरींच्या ९१ जणांच्या टीममध्ये २६ जणांची मुख्य कार्यकारणी आहे. त्यात एक जिल्हाध्यक्ष, एक कोषाध्यक्ष, चार सरचिटणीस, १० उपाध्यक्ष व १० चिटणीस यांचा समावेश आहे. कार्यकारिणी सदस्यांची ६५ जणांची यादी आहे.

यात प्रत्येक तालुक्यातील तीनपेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे जुने व नवीन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संधी देण्याची काळजी घेण्यात आली आहे. यात २६पैकी १८ महिला पदाधिकारी पदवीधर, पदविका व त्यापेक्षा जास्त शिकलेल्या आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत यशस्वी नेतृत्व करणाऱ्या अनुभवी चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एससी, एसटी, एनटी व ओबीसी समाजासोबत व्यापारी, वकील, व्यावसायीक अशा सर्वसमावेशक वर्गाला प्रतिनिधीत्व दिल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now