जळगाव लाईव्ह न्यूज । भाजपतर्फे मंत्री संजय सावकारे, भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जळगाव महानगरपालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील भाजपा कार्यालयात दुपारी चारनंतर मुलाखतींना सुरुवात झाली आहे. यावेळी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 75 जागांसाठी 550 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालयात मोठी गर्दी केली आहे.

कार्यालय परिसरात वाहनांची मोठी गर्दी झाल्याने काही काळासाठी रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे कोर्ट परिसराकडे जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना वाहतूक जामचा त्रास सहन करावा लागला.










