बातम्या

राज्यात भाजप सत्तेत : मनपात भाजप नगरसेवक ‘फॉर्म’ मध्ये येणार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेत भाजप नगरसेवकांनी बंडखोरी केली. यामुळे मनपातील भाजपाची सत्ता गेली, सत्ता गेल्यानंतर सत्ता गेल्यानंतर वर्षभरापासून भाजप नगरसेवकांनी सतरा मजलीकडे पाठ फिरवली हाेती. परंतु राज्यात सत्तांतर हाेताच भाजप नगरसेवकांच्या आशा उंचावल्या असून ते पून्हा फॉर्म मध्ये आले आहेत. गिरीश महाजन मंत्री झाल्यास पुन्हा निधीची दारे उघडतील असा विश्वास व्यक्त हाेत आहे. मनपात शिवसेनेची सत्ता असली तरी आगामी काळात आपलीच मर्जी चालेल, असा विश्वासही व्यक्त हाेत आहे.( Jalgaon Municipal Corporation )


गेले १० दिवस राज्यात सत्तांतर हाेणार हीच चर्चा सुरू हाेती. झाले तसेच गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली. भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे सरकार राज्यात काम करणार आहे. या संपूर्ण घडामाेडीनंतर मनपाच्या राजकारणावर परिणाम हाेण्यास सुरुवात झाली आहे. २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकीत ७५ पैकी ५७ जागांवर विजय मिळवलेल्या भाजपला अडीच वर्षांनंतर आपल्याच नगरसेवकांच्या बंडखाेरीमुळे विराेधी बाकावर बसण्याची वेळ आली. आता शिवसेनेतील आमदारांच्या बंडखाेरीमुळे राज्यात भाजपची सत्ता आली. राज्यात सत्ता आल्याने जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार. गिरीश महाजनांच्या हाती पुन्हा जिल्ह्याची सूत्रे येऊ शकतात.


सन २०१८ पूर्वी मनपात खाविआची सत्ता हाेती. तर राज्यात भाजपचे सरकार हाेते. मनपात भाजप नगरसेवकांवर अन्याय हाेत असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ काेटींचा निधी मंजूर केला हाेता.


महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर भाजपच्या ३० नगरसेवकांपैकी निवडक नगरसेवकांचे सतरा मजलीत येणे-जाणे सुरू हाेते. शिवसेना व बंडखाेरांच्या हाती पालिकेची सूत्रे गेल्यामुळे भाजप नगरसेवकांना फार महत्त्वही दिले जात नव्हते. त्यामुळे वर्षभरापासून भाजप नगरसेवकांनी सतरा मजलीत येणे बंद केले हाेते.

Related Articles

Back to top button