⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | धरणगाव येथे भाजपचा स्थापना दिन साजरा

धरणगाव येथे भाजपचा स्थापना दिन साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । धरणगाव तालुक्याच्या वतीने भाजपचा स्थापना दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटिल यांनी सर्वांना लाडू खाऊ घातले. उत्साहाच्या सुरुवातीस जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांनी भारतमातेचे पूजन केले तर पुनीलाल महाजन यांनी माल्यार्पण केले. या प्रसंगी शिरिष बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष ऍड. संजय महाजन, प्रकाश सोनवणे, ऍड. वसंतराव भोलाने, शेखर पाटील, दिनेश पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, कडु बयास, भालचंद्र माळी, सुनील चौधरी, मधुकर पाटील, कन्हैया रायपूरकर, टोनी महाजन, सचिन पाटील, अनिल महाजन, विशाल महाजन, दुर्योधन भिल, विक्की महाजन, किशोर चौधरी, रवी पाटील, रवी मराठे व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. तर 21ऑक्टोबर 1951 जनसंघ-डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाल ते 6 एप्रिल 1980 भा.ज.पा.- श्रध्येय अटलजी, आडवाणी ते आज मा.मोदी ‘अमित असा हा, अंगीकारलेल्या विचारांशी एकनिष्ठ राहून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आशीर्वाद व मार्गदर्शन घेत जुन्या व नव्या कार्यकर्ते, नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी केलेला दीर्घ प्रवास. सत्ता हे साध्य नसून साधन आहे, अंत्योदय सर्वांचा विकास, सशक्त व संस्कारित-वैचारिक भारत हे ध्येय सर्वांनी समोर ठेवले. त्या वेळेस स्व.अटलजी उदगारलेले वाक्य,’ सुरज उगेगा, अंधेरा छटेगा, कमल खिलेगा ‘ याची प्रचिती आज दिसतेय. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ सबका साथ सबका विकास हे उद्दिष्ट ठेवून घेतली. मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला

दरम्यान, 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. 21ऑक्टोबर 1951 जनसंघ-डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी,पंडित दिनदयालजी ते 6 एप्रिल 1980 भा.ज.पा.- श्रध्येय अटलजी,आडवाणीजी ते आज मा.मोदीजी ‘अमितजी असा हा, अंगीकारलेल्या विचारांशी एकनिष्ठ राहून,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आशीर्वाद व मार्गदर्शन घेत जुन्या व नव्या कार्यकर्ते, नेत्यांनी,लोकप्रतिनिधींनी केलेला दीर्घ प्रवास. सत्ता हे साध्य नसून साधन आहे,अंत्योदय सर्वांचा विकास,सशक्त व संस्कारित-वैचारिक भारत हे ध्येय सर्वांनी समोर ठेवले. त्या वेळेस स्व.अटलजींनी उदगारलेले वाक्य,’ सुरज उगेगा, अंधेरा छटेगा,कमल खिलेगा ‘ याची प्रचिती आज दिसतेय. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ सबका साथ सबका विकास हे उद्दिष्ट ठेवून घेतली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह