बंडखोरी भोवली! जळगावमध्ये भाजपकडून माजी नगरसेवकांसह २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

जानेवारी 8, 2026 11:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२५ । एकीकडे जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असताना मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडलीय. भाजपने तब्बल २७ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली. भाजपनं केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकारणासह राज्यातही खळबळ उडलीय.

bjp

जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही इच्छुकांनी उमेदवारी मागे न घेता बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. भाजपच्या नावाचा आणि पक्षाच्या प्रतिमेचा गैरवापर करत काही अपक्ष उमेदवार हे मतदारांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता.

Advertisements

प्रचारादरम्यान संबंधित सर्व अपक्ष उमेदवार आणि त्यांचे समर्थक स्वतःला भाजपशी संबंधित असल्याचे भासवत असल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या तब्बल २७ जणांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले. या तडकाफडकी कारवाईमुळे भाजपमध्ये शिस्त राखण्याचा संदेश देण्यात आला असून, महापालिका निवडणुकीत कोणतीही गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी भाजप नेतृत्व ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisements

भाजपमधून यांची हकालपट्टी
जितेंद्र भगवान मराठे, संगिता गोकूळ पाटील, हर्षदा अमोल सांगोरे, धनश्री गणेश बाविस्कर, गणेश दत्तात्रय बाविस्कर, रंजना भरत सपकाळे, कांचन विकास सोनवणे, प्रमोद शांताराम शिंपी, भरत शंकर सपकाळे, हिरकणी जितेंद्र बागरे, चेतना किशोर चौधरी, मयूर श्रावणी बारी, तृप्ती पांडुरंग पाटील, सुनील ज्ञानेश्वर पाटील, विकास प्रल्हाद पाटील, गिरीश कैलास भोळे, कैलास बुधा पाटील, हेमंत सुभाष भंगाळे, प्रिया विनय केसवानी, रूपाली स्वप्नील चौधरी, अंजू योगेश निंबाळकर, मयुरी जितेंद्र चौथे, जयश्री गजानन वंजारी, ज्योती विठ्ठल पाटील, उज्ज्वला संजय घुगे, दिनेश मधुकर ढाकणे, कोकिळा प्रमोद मोरे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now