जळगावात भाजपने केला जल्लोष…
जळगाव लाईव्ह न्युज । २१ जून २०२२ । संपूर्ण देशात गाजत असलेल्या महाराष्ट्र विधान परिषेदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय प्राप्त केला असून या विजयाचा आंदोत्सव भाजपा कार्यालय वसंत स्मृती, बळीराम पेठ येथे आज मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता भाजपा जळगाव महानगराच्या वतीने जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, डॉ.राजेंद्र फडके, माजी महापौर स्मिता भोळे यांच्या प्रमुख उपस्थित पटाके फोडून, पेढे वाटप करून जल्लोषात विजयोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. राजेंद्र फडके यांनी सांगितले कि, महाराष्ट्राचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील, संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन, जळगाव शहराचे आमदार व भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्या प्रयत्नाला यश आले असून, याहून समजते कि, महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याचे पुन्हा दिसून येत आहे. महाराष्ट्र विधानपरिषद अभि झाकी है, अभि विधानसभा बाकी है असे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच जळगाव भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व पुढे म्हणाले राज्यसभेत जसा विजय प्राप्त केला, तसेच विधानपरिषद निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून देणारे महाराष्ट्राचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे खरे किंगमेकर आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी डॉ.राजेंद्र फडके, दिपक सुर्यवंशी, स्मिता भोळे, डॉ.राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, भगत बालानी, दिपक साखरे, सुशील हासवाणी, राजेंद्र मराठे , राहुल वाघ, ॲड शुचिता हाडा, संजय लुल्ला, शक्ती महाजन, आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.