जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ एप्रिल २०२१ । भारतीय जनता पार्टीचा ४१ वा वर्धापन दिन आज मंगळवार (दि.६) रोजी भाजप कार्यालय वसंतस्मृती बळीराम पेठ येथे सकाळी ९.०० वाजता जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते पक्षध्वजवंदन करण्यात आले. व प्रतिमापूजन प्रदेश उपाध्यक्षा मा.आ स्मिताताई वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी,यांनी छत्तीसगड येथील नक्षली हल्य्यात शहीद झालेल्या जवानांना व जिल्हा महानगर उपाध्यक्षा शरीफाताई तडवी व द्वीगत कार्यकर्त्याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी
कार्यकर्त्यात संबोधित करतांना आ,सुरेश भोळे(राजूमामा) पक्षाच्या आतापर्यंत ४१ वर्षाचा लेखा जोखा सादर केला.व जळगाव जिल्ह्यातील जेष्ठ, द्रिगंत कार्यकर्ते यांनी जन संघ ते भाजपापर्यंत केलेल्या कार्यकर्त्यांचा गौरव केला. व आज भाजपा हा एकनिष्ठ कार्य केलेल्या कार्यकरत्या मुळेच आज संपुर्ण जगात आपला पक्ष एक नंबर आहे.
आजचे हे वैभव आपल्याल्या जे पाहायला मिळत आहे.ते फक्त कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे म्हणून भा ज पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, म्हणुनच केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार दुसऱ्यांदा सत्येत आलो आहे. असे आ,सुरेश भोळे(राजूमामा) यांनी सांगितले महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी सुध्दा जळगाव शहरात पक्षवाढीसाठी कार्य केलेल्या जेष्ठ कार्यकर्ते आभार व्यक्त केले व त्यांचा गौरव केला.
या प्रसंगी मा महापौर भारतीताई स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील गटनेते भगतबालाणी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे, अमित भाटीया सुशील हासवाणी उज्वलाताई बेडाळे, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, भगतसिंग निकम, विठ्ठल पाटील मनोज भांडारकर वि क्षेत्र प्र दीपक साखरे, गणेश माळी, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, मंडल अध्यक्ष रमेश जोगी, अजित राणे, संजय लुला, शक्ति महाजन, केदार देशपांडे, नगरसेवक जितेंद्र मराठे, सुरेश सोनवणे, गायत्री ताई राणे, अँड.सुचिता हाडा, कैलास अप्पा सोनवणे, विजय पाटील, विजय वानखेडे, पिंटू काळे, संजय (विठोबा) चौधरी संजय विसपुते, महिला आघाडि अध्यक्षा सौ दिप्ती चिरमाडे, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, आघाडी अध्यक्ष अशोक राठी, जयेश भावसार लता ताई बाविस्कर, प्रा प्रवीण जाधव, दिपक बाविस्कर, प्रभाकर तायडे, प्रमोद वाणी, हेमंत जोशी, अरुण श्रीखंडे, गणेश वाणी, संजय एम शर्मा, सचिन बाविस्कर गौरव पाटील, भूषण पाटील, अबोली पाटील, जितेंद्र चौथे, दिनेश पुरोहित, भूषण कुळकर्णी, चंदू महाले आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
तसेच महानगरातील ९मंडला मधे प्रत्येक बुथ वर प्रतिमा पुजन व कार्यकर्ते घरी पक्षाचा झेंडा वंदन केला जेष्ठ कार्यकर्ते मा नगरसेवक उदयजी भालेराव यांनी सायंकाळी व्हर्रचूल लिंक द्वारे कार्यकर्त्यांना पक्षाने ४१ वर्षात केलेल्या कामांची माहिती व मार्गदर्शन मोबाईल लिंक द्वारे दिले.