⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

विधानसभा गदारोळ प्रकरणी गिरीश महाजनांसह १२ आमदार निलंबित

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जुलै २०२१ । सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा देखील समावेश आहे. 

आज दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशला सुरुवात झाली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. 

‘हे’ १२ आमदार निलंबित

यामध्ये गिरीश महाजन, पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांचा समावेश आहे.