जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२३ । जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. दरम्यान जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन जवळून दुचाकी लांबविणाऱ्या संशयित चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. राहुल गणेश महाजन (वय-२०) रा. तांबापुरा ता.जळगाव असे अटक केलेल्या चोराचे नाव असून त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.
जळगावातील आकाशवाणी चौकात परिवारासह वास्तव्याला असलेले भाऊसाहेब दादाजी बागुल यांची २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता ते आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जवळ दुचाकी (एमएच ४१ आर २३६३) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान चोरून नेलेली दुचाकी ही लाडवंजारी मंगल कार्यालयावरून संशयित आरोपी राहुल महाजन हा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दिली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संजय सपकाळे, जितेंद्र राजपूत, विजय खैरे, पोलीस नाईक हेमंत कळसस्कर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल इरफान मलिक, विजय जाधव यांनी कारवाई करत संशयित आरोपी राहुल गणेश महाजन याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.