⁠ 
सोमवार, मे 27, 2024

महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी, 12वी परीक्षेच्या निकालाबाबत मोठी अपडेट, कधी लागणार निकाल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२४ । फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा पार पडल्या. यानंतर आता निकाल कधी लागणार? याकडे विद्यार्थी आणि पालक वर्गाचे डोळे लागले आहेत. अशातच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच जाहीर करू शकते.आधी बारावीचा निकाल त्यानंतर दहावीचा निकाल जाहिर होऊ शकतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यर्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येईल.

राज्यात यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली तर दहावीची परीक्षा 1 मार्च पासून सुरू झाली होती. यंदा एकूण 31 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिली. आता विद्यार्थ्यांसह पालक वर्ग निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

याप्रमाणे SSC HSC निकाल पाहता येणार?
महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र SSC HSC निकाल 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव यासारखी आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
तुमचा महाराष्ट्र बोर्ड 10वी, 12वी चा निकाल 2024 स्क्रीनवर दिसेल.
परिणाम तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी जतन करा.

महाराष्ट्र बोर्ड SSC, HSC साठी उत्तीर्णतेचे निकष काय आहेत?
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वी, 12वी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35% गुण मिळणे आवश्यक आहे. यामध्ये मुख्य आणि ऐच्छिक अशा सर्व विषयांसाठी थिअरी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश आहे.

गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्र बोर्डाचे निकाल कधी जाहीर झाले?
यूपी, एमपी, बिहार, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड बोर्ड निकाल 2024 प्रमाणे, यावर्षी महाराष्ट्र बोर्ड देखील लवकर निकाल जाहीर करू शकते. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल या तारखांना जाहीर झाला-
2023 – 25 मे
2022 – 7 जून
2021 – 3 ऑगस्ट
2020 – 16 जुलै
2019 – 28 मे