⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

मोठी बातमी : बोर्डाच्या परीक्षेत होणार ‘हे’ महत्वाचे बदल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । जेईई, सीयूईटी या परीक्षांमध्ये केंद्र शासनाने मोठे बदल केले होते. त्या नंतर आता बोर्डाच्या परीक्षांमध्ये मोठे बदल होणार आहेत. भारत सरकार म्हणजेच नरेंद्र मोदी यांचे केंद्र शासन लवकरच या मध्ये मोठे बदल करणार आहे. १० वि व १२ वि करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जे गुण आहेत त्याची पारख व्हावी यातही हे बदल करण्यात येणार आहेत. (PARAKH)

हे बदल करताना ‘PARAKH’ या नव्या परीक्षा नियामक संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. असे करण्यामागे केंद्र सरकारचा (Central Government) एकच उद्देश आहे- देशभरातील बोर्डाच्या परीक्षांमध्ये समानता आणणे. दहावी आणि बारावीच्या स्तरावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी एकसमान आराखडा तयार करणे. हे या मागचे उद्दिष्ट आहे.

बोर्डाच्या परीक्षा एकसमान करण्याचा केंद्राचा विचार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यांच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेबरोबर अनेक बैठका घेतल्या आहेत. या बैठकांचा परिणाम म्हणून, एक नवीन मूल्यांकन नियामक तयार केला जात आहे, ज्याचे नाव पारख आहे.

राज्यांशी झालेल्या चर्चेत असे दिसून आले आहे की, बहुतेक राज्ये वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याच्या एनईपीच्या प्रस्तावाला पाठिंबा देत आहेत. यापैकी एका परीक्षेच्या मदतीने मुले त्यांचे गुण सुधारण्यास मदत करतील. त्याचबरोबर मॅथ्समध्ये दोन प्रकारचे पेपर देण्याचेही राज्यांनी मान्य केले आहे. एक म्हणजे स्टँडर्ड मॅथ्स आणि दुसरं म्हणजे उच्चस्तरीय गणित.यामुळे मुलांना आत्मविश्वास मिळणार आहे.