⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मोठी बातमी : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची जबाबदारी मंत्र्यांकडे नाही तर आमदारांकडे

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । शिवसेनतील फुटीनंतर येत्या ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या दसऱ्या मेळ्याव्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र यात महत्वाची बातमी म्हणजे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची जबाबदारी मंत्र्यांकडे देण्यात आलेली नसून ती आमदारांकडे देण्यात आली आहे.

आपापल्या गटाचा स्वतंत्र दसरा मेळावा दणक्यात होण्यासाठी ठाकरे आणि शिंदे या सेनेच्या दोन्ही गटांमध्ये मोठी रस्सीखेच होणार यात वाद नाही. या बाबद नुकतीच शिंदे गटाची बैठक झाली. यावेळी खरी शिवसेना कुणाची याची कसोटी लावण्यासाठी कळीचा मुद्दा ठरणाऱ्या या मेळाव्यांमधील शक्ती प्रदर्शन ही गरज ठरणार आहे. त्याच अनुषंगाने आपापल्या भागातून अधिकाधिक गर्दी जमवण्याची जबाबदारी आता बंडखोर आमदारांनी आपल्या शिरावर घेतल्याचे या बैठकीतून समोर आले आहे.

दरवर्षी दादर येथे शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा भरतो. परंतु शिवसेनेत बंडखोरी करत भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी राज्यात नुकतेच सत्तांतर घडवून आणले आहे. यामुळे हा मेळावा खूप महत्वाचा आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दसरा मेळाव्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कची मागणी केली आहे.मात्र अजून मुंबई महानगरपालिकेने कोणताही निर्णय दिलेला नाही. दुसरीकडे पर्यायी जागा म्हणून वांद्रे कुर्ला संकुलातील मैदान मिळण्यासाठी शिंदे गटाने केलेला अर्ज एमएमआरडीने मंजूर केला आहे. तर महापालिकेने अद्याप मंजुरी दिली नसली तरी शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्यावर ठाकरे गट ठाम आहे.

हे सगळं जरी असलं तरी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची जबाबदारी मंत्र्यांकडे देण्यात आलेली नसून ती आमदारांकडे देण्यात आली आहे. यामुळे नक्की या मेळाव्यावेळी काय होत? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.