सोमवार, डिसेंबर 11, 2023

मोठी बातमी: शरद पवार आणि मंत्री गुलाबराव पाटील करत आहेत रेल्वेतून एकत्र प्रवास !

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२३ । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र जळगावला येत असून एकाच गाडीतून एकाच बोगिमध्ये प्रवास करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 16 जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. मात्र 15 म्हणजे आज रात्री नऊ वाजता ते जळगाव शहरामध्ये येणार आहेत. ते राजधानी मधून प्रवास करत आहेत. अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाच्या एक दिवशीय शिबिरास ते मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान मुंबई येथून शरद पवार आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सोबत प्रवास करत आहेत.

जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे राजधानी एक्सप्रेस मधून एकत्र प्रवास करत असल्याचे समोर येत आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांमध्ये जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात चर्चा झाल्याचे समोर येत आहेत. दोघांच्या सोबत प्रवासामुळे राजकीय वर्तुळामध्ये आश्चर्य व्यक्त केला जात आहे. मात्र या दोघांमध्ये कोणती राजकीय चर्चा झाली काय़? हे मात्र ते जळगाव मध्ये आल्यावरच समजणार आहे.