जळगाव शहरातील पाणीपुरवठ्याबाबत मोठी बातमी
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरातील उद्या शनिवारच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठी बातमी आहे. मनपाच्या वाघूर पंपिंग स्टेशनसाठी एमआयडीसीतील ३३ केव्ही वीज वाहिनी फीडरच्या देखभाल दुरुस्तीचे काम महावितरणतर्फे शनिवारी केले जाणार आहे. त्यामुळे वाघूर पंपिंग व जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याने शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणीपुरवठ्याचे रोटेशन एक दिवस पुढे ढकलल्याने २६ रोजी पाणीपुरवठा २७ रोजी तर २७ व २८ रोजीचा पुरवठा २८ व २९ रोजी केला जाणार आहे. रविवारी पिंप्राळा गावठाण, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबानगर, अष्टभुजा, निवृत्तीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडीचा भाग, नित्यानंदनगर, समतानगर, तांबापुरा, जिल्हापेठ, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी पाणी येणार असल्याचे उपअभियंता संजय नेमाडे यांनी कळवले आहे.